फोटो सौजन्य - espncricinfo
आयपीएल २०२५ – पंजाब किंग्स : पंजाब किंग्जचा नवा खेळाडू आणि स्फोटक युवा फलंदाज प्रियांश आर्य इंडियन प्रीमियर लीगच्या म्हणजेच आयपीएलच्या आगामी आवृत्तीसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. वयाच्या नवव्या वर्षापासून क्रिकेट खेळत असलेल्या प्रियांश आर्यला २०२५ च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने निवडले होते आणि तो त्याचा पहिला आयपीएल हंगाम खेळणार आहे. प्रियांश आर्य भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळण्यास उत्सुक आहे. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एका षटकात ६ षटकार मारल्यानंतर प्रियांश आर्य प्रसिद्धीच्या झोतात आला. पंजाबने त्याला लिलावात ३.८० कोटी रुपयांना खरेदी केले होते.
WPL 2025 : हरमनप्रीत कौरने केला मोठा चमत्कार अशी करणारी दुसरी महिला, वाचा सविस्तर
आयपीएल २०२५ बद्दल प्रियांश आर्य म्हणाला, “मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगला भेटण्यासाठी मी खरोखर उत्सुक आहे. मला त्याचा पुल शॉट खूप आवडतो. श्रेयसला भेटण्यासाठी मी देखील उत्सुक आहे, मला त्याचा दृष्टिकोन आणि चालण्याची पद्धत खूप आवडते. मी श्रेयसला यापूर्वी कधीही भेटलो नव्हतो. मला वाटतं तो एक उत्तम कर्णधार आहे. त्याने कर्णधार म्हणून आयपीएल आणि सर्व स्थानिक ट्रॉफी जिंकल्या आहेत. म्हणूनच मला वाटते की तो सर्वोत्तम खेळाडू आणि कॅप्टन आहे.”
ऑगस्ट २०२४ मध्ये, आर्यने दिल्लीच्या घरगुती टी२० लीगमध्ये एका षटकात सहा षटकार मारून संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आणि असे करणारा तो चौथा भारतीय क्रिकेटपटू बनला. त्या क्षणाची आठवण करून देताना तो म्हणाला की, ही कामगिरी केल्यानंतर भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवकडून त्याच्यासाठी एक खास संदेश आला . याबद्दल तो म्हणाला, “तीन षटकार मारल्यानंतर, मला विश्वास निर्माण झाला की मीही सहा षटकार मारू शकतो, कारण माझा संघमित्र आयुष बदोनी प्रत्येक सामन्यात एका षटकात चार ते पाच षटकार मारत होता. मी ते केल्यानंतर, सूर्यकुमार यादवने मला मेसेज केला आणि सांगितले की माझी फलंदाजी पूर्णपणे मनोरंजक होती आणि मला स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगितले. हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होते.”
Priyansh Arya on Shreyas Iyer:-
“I am excited to meet Shreyas. I love his attitude and the way he walks. I have never met Shreyas earlier. I think he is a great leader, he has won IPL and all domestic trophies as a captain. So I feel he is the best leader”
Shreyas oozes AURA🥵 pic.twitter.com/QtGDqwyDxr
— MaHi Edwards 🚀 (@MaHiShreyasian) February 15, 2025
तो आयपीएल २०२४ च्या आधी लिलावातही होता, पण कोणत्याही फ्रँचायझीने त्याला विकत घेतले नाही. तथापि, त्याने या पराभवाचा स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही आणि आपल्या खेळावर कठोर परिश्रम करत राहिला. गेल्या हंगामातील आयपीएलपूर्वीच्या त्याच्या भावना आठवत २४ वर्षीय सलामीवीर म्हणाला, “निवड न झाल्याने मला वाईट वाटले. या वर्षी, पुन्हा एकदा, मला लिलावाकडून खूप अपेक्षा होत्या, पण मी त्याबद्दल विचार करत नव्हतो आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० सामन्यांवर लक्ष केंद्रित करत होतो. पंजाब किंग्जने निवडल्यानंतर, मी खूप आनंदी होतो पण जास्त आनंद साजरा करू शकलो नाही आणि मी स्पर्धेवर लक्ष केंद्रित करत राहिलो. मी लवकरच नक्कीच साजरा करेन.”