सांजना गणेशन आणि जसप्रीत बूमराह(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. २० जूनपासून लीड्स येथे पहिल्या कसोटी सामन्याला सुरवात झाली आहे. भारताने पहिल्या डावात ४७१ उभारल्या तर इंग्लंडने प्रतिउत्तरात ४६५ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बूमराहने ५ विकेट्स घेऊन ब्रिटिशांना अडचणीत आणून भारताला ६ धावांची आघाडी मिळवून दिली होती. बूमराहने ८३ धावांत ५ गडी माघारी पाठवले. बुमराहने लीड्स कसोटीच्या चौथ्या दिवसापूर्वी त्याची पत्नी आणि क्रीडा सादरकर्ता संजना गणेशनला एक खास मुलाखत दिली. या दरम्यान संजनाने बुमराहच्या फिटनेस आणि शरीरयष्टीबद्दल काही प्रश्न विचारले आहेत.
हेही वाचा : IND Vs ENG : इंग्लंडमध्ये KL Rahul ने लिहिला इतिहास! भारतीय सलामीवीराने पाहिल्यांदाचा केला ‘हा’ कारनामा..
लीड्स कसोटीत भारतीय संघासाठी बुमराची कामगिरी खूप महत्त्वाची राहिली आहे. पहिल्या डावात त्याने २४.४ षटके गोलंदाजी करत ८३ धावांमध्ये ५ विकेट्स घतेल्या. गेल्या काही वर्षांपासून बूमराह दुखापतींशी झुंजत आला आहे. बुमराहची फिटनेस हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मुलाखतीच्या सुरुवातीलाच संजनाने त्याला त्याच्या शरीराच्या स्थितीबद्दल विचरणा केली. संजनाने विचारले, ‘जसप्रीत, या कसोटी सामन्यात तुझे शरीर कसे प्रतिसाद देत आहे?’ यावर उत्तर देताना बुमराह हसला आणि बोलला, “सर्व काही ठीक आहे. मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि सद्या गोलंदाजीचा आनंद घेत आहे.”
बुमराहने दिलेले उत्तर हे प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी आनंद देणारे असेच होते. क्रीडा सादरीकरण करणाऱ्या संजनाने या मुलाखतीत बुमराहशी सहज आणि व्यावसायिक पद्धतीने गप्पा मारल्या. त्यानंतर सोशल मीडियावर या जोडीचे खूप कौतुक देखील करण्यात येत आहे. यादरम्यान, संजनाने बुमराहला असे देखील सांगितले की, “या मालिकेतील सर्व ५ सामने तू खेळावेत अशी सर्वांना इच्छा आहे.” परंतु, बुमराहने याबाबत काही एक उत्तर दिले नाही. अधिक माहिती अशी की, बुमराहकडून या मालिकेपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, तो वर्कलोड व्यवस्थापन लक्षात घेऊन या मालिकेतील सर्व ५ सामन्यांचा भाग असणार नाही.
हेही वाचा : IND Vs ENG : Rishabh Pant चे सलग दुसरे शतक! इंग्लंडमध्ये रचला इतिहास, ‘असे’ करणारा ठरला पहिला भारतीय..
जसप्रीत बुमराने पहिल्याच षटकात जॅक क्रॉलीला माघारी पाठवून संघाला पहिले यश मिळवून दिले होते. त्यानंतर बुमराहने बेन डकेटला बाद केले. त्यांनंतर बुमराहने घातक ठरत जाणाऱ्या जो रूटला आपली शिकार बनवले. तिसरे यश मिळवले. त्यानंतर बुमराहने ख्रिस वोक्स आणि जोश टँग यांना बाद करून पाच विकेट्स पूर्ण केल्या. बुमराहने ८३ धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या.