ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
Rishabh Pant’s second consecutive century against England! भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने सलग दुसरे शतक झळकावले आहे. दोन्ही डावात सलग शतक ठोकण्याचा विक्रम रचला आहे. हेडिंग्ले, लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ऋषभ पंतने १४० चेंडूत ११८ धावा केल्या आहेत. त्याला शोईब बशीरने माघारी पाठवले आहे. परंतु, त्याने आपल्या खेळीने मोठा कारनाम केला आहे.
टीम इंडियाचा विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतने लीड्स कसोटीत इतिहास लिहिला आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात १३४ धावांची शानदार शतकी खेळी केल्यानंतर, पंतने दुसऱ्या डावात देखील १०० धावांचा टप्पा गाठून एक मोठा विक्रम केला आहे. तो कोणत्याही सेना कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकवणारा आशियातील पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. त्याच्या या खेळीमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियाने मजबूत आघाडी घेतली आहे. त्याच्या आधी भारताचा सलामीवीर केएलक राहुलने देखील आपले ऐतिहासिक शतक पूर्ण केले असून तो मैदानावर टिकून आहे.
ऋषभ पंतने दुसऱ्या डावात फक्त १३० चेंडूत आपल्या शतकाला गावसमी घातली आहे. त्याच वेळी, पहिल्या डावात, त्याने १४६ चेंडूत ही कामगिरी केली होती. पंतचे हे कसोटी क्रिकेटमधील ८ वे शतक ठरले आहे. विशेष म्हणजे त्याने भारताबाहेर यापैकी ६ शतके लागावळी आहेत. त्याच वेळी, इंग्लंडविरुद्ध ही त्याची ५ वी शतकी खेळी ठरली आहे. त्याने इंग्लंडमध्ये खेळताना यापैकी ४ शतके झळकावली आहेत. पंतच्या शतकामुळे तो परदेशी भूमीवर सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या यष्टीरक्षक-फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच दोन्ही डावात सलग शतक मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : चौथ्या दिवशी केएल राहुलचे दमदार शतक! इंग्लंडविरुद्ध भारताकडे २४० धावांची भक्कम आघाडी..
📸 📸
What an entertainer! What a performer! 🫡 🫡
Rishabh Pant – Take. A. Bow 🙌
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu #TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17 pic.twitter.com/I7e87xjLG6
— BCCI (@BCCI) June 23, 2025
सामन्याची स्थिति
चौथ्या दिवशी भारताने ९० धावांवरून पुढे खेळायला सुरवात केली. केएल राहुलने ४७ धावांवरून खेळायला सुरवात केली तेव्हा सावध पवित्रा घेतला होता. त्याच्या सोबत संघाचा कर्णधार शुभमन गिलने ६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरवात केली. परंतु त्यामध्ये तो केवळ १० धावांची भर घालु शकला. त्याला ब्रायडन कार्सने १६ धावांवर बाद केले. त्यानंतर संघाचा उपकर्णधार ऋषभ पंत मैदानात फलंदाजील आला. पंत आणि राहुल यांनी अतिशय चतुराईने फलंदाजी करत धावा जमवायला सुरवात केली. या दरम्यान केएल राहुलने आपले शतक पूर्ण केले. तो आता १२० धावांवर खेळत आहे. राहुल पाठोपाठ ऋषभ पंतनेही शतक पूर्ण केले. तो ११८ धावांवर बाद झाला. त्यांतर मैदानात करून नायर आला आहे. आता नायर आणि राहुल दोघे खेळत आहेत. भारताकडे ३०४ धावांची आघाडी आहे. भारताच्या ४ विकेट्स गेल्या आहेत. ९५ धावांवर खेळत आहे.
भारताला २६० धावांची आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या दिवशी भारताने ६ धावांच्या आघाडीसह फलंदाजीला सुरवात केली. तेव्हा भारताची सुरवात चांगली राहिली नाही. भारताने १६ धावांवर पहिली विकेट गमावली. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल ४ धावांवर बाद झाला. त्याला ब्रायडन कार्सने बाद केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आला पहिल्या डावात शून्यावर बाद होणारा साई सुदर्शन. त्याने केएल राहुलसोबत आश्वासक सुरवात केली. साई सुदर्शन सेट होत असल्याचे दिसत असताना त्याला ३० धावांवर बेन स्टोक्सने आपला शिकार बनवले होते.