जसप्रीत बुमराह(फोटो-सोशल मीडिया)
IND VS ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतने शानदार कामगिरी केली. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लडविरुद्धची ही मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेत टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेत ५ पैकी केवळ ३ सामनेच खेळू शकला. बुमराहने वर्कलोड मॅनेजमेंटमुळे इंग्लंड दौऱ्यात फक्त ३ सामने खेळले. आता मात्र या इंग्लंड दौऱ्यानंतरद देखील बुमराहच्या वर्कलोडबाबतची चर्चा रंगली आहे. बुमराह सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्याने त्याला महत्त्वाच्या सामन्यात भाग घेता येत नाही. यावरुनच भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीने जसप्रीत बुमराहचे कान टोचले आहेत.अझरुद्दीने भारताला कोणत्याही स्थितीत बुमराहची फारच गरज लागली तर पुढे काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
एका वृत्तानुसार मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला की “जर दुखापत असेल तर खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांना याबाबतचा निर्णय घ्यावा. मात्र जेव्हा टीमचा भाग असता तेव्हा तुम्ही कोणत्या सामन्यात खेळायचं हे स्वत:च्या मर्जीनुसार ठरवू शकत नाहीत. वर्कलोड ही बाब मान्य आहे. पण, या स्तरावर तुम्हाला परिस्थितीनुसार व्यवहार करावा लागणार आहे, तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत आहात.” अशा भाषेत माजी कर्णधाराने जसप्रीत बुमराहचे कान टोचले.
मोहम्मद अझरुद्दीन पुढे म्हणाला की, “मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि आकाश दीप यांनी चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे बुमराहशिवाय आम्ही सामना जिंकला ही एक जमेची बाजू आहे. मात्र भारताला जेव्हा बुमराहची जास्त आवश्यकता असेल तेव्हा काय होणार?” असा प्रश्न अझरुद्दीनने उपस्थित केला आहे.
अझरुद्दीनने भारतीय कसोटी संघाचा युवा कर्णधार शुबमन गिलचे कौतुक केलं. भारत-इंग्लंड ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत शुबमन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ५ सामन्यांमध्ये एकूण ७५४ धावा फटकावल्या आहेत.
अझरुद्दीन पुढे बोलताना म्हणाले, “इंग्लंड दौऱ्यापूर्वी कर्णधार शुबमन गिल याच्यावर बरीच टीका करण्यात आली होती. मात्र याच युवा संघाने उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली. शुबमन गिल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा या तिघांनी देखील त्यांची भूमिका चोखपणे पार बजावली. तसेच गिलने कर्णधार म्हणून देखील शानदार सुरुवात केलीआहे.”, असंही अझरुद्दीन याने म्हटले आहे.