फोटो सौजन्य - BCCI
जय शाह : भारताचा युवा संघ सध्या झिम्बाम्ब्वेविरुद्ध मालिका खेळत आहे. या संघाची कमान शुभमन गिलकडे (Shubman Gill) सोपवण्यात आली आहे. भारताच्या संघाने T२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावले आणि संपूर्ण देशामध्ये उत्सव साजरा करण्यात आला. भारतीय संघाची निवड झाल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी भविष्यवाणी केली होती यंदाचा विश्वचषक भारत जिंकणार आहे. त्यानंतर भारताच्या संघाने विश्वचषकामध्ये एकही सामना न गमावता विश्वचषक जिंकला. त्यानंतर जय शाह यांनी आणखी दोन भविष्यवाणी जिंकल्या आहेत. त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) यासंदर्भात भविष्यवाणी केली आहे.
जय शाह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. जय शाह यांनी T-२० विश्वचषक (T-20 World Cup 2024) जिंकण्याचे श्रेय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना दिले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल मोठी माहिती दिली. जय शाह म्हणाले की, रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
या व्हिडिओमध्ये जय शाह म्हणाले की, “या १ वर्षांमध्ये आपण तिसऱ्यांदा फायनल खेळलो. जून २०२३ यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभूत झालो. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मी राजकोटमध्ये सांगितले होते २०२४ मध्ये आपण मनं सुद्धा जिंकणार, कप सुद्धा जिंकणार आणि भारताचा झेंडा गाढणार आणि गाडला सुद्धा. त्याचबरोबर त्यांनी बुमराह, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंह आणि सूर्यकुमार यादव यांचे आभार मानले. या विजयानंतर पुढील लढत आहे ती म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि चॅम्पियन ट्रॉफी मला पूर्ण विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही या दोन्ही स्पर्धेंमध्ये चॅम्पियन होऊ”
Jay Shah dedicates the World Cup Final victory to Dravid, Rohit, Kohli and Jadeja.
– He also confirms Rohit will lead India in WTC Final and Champions Trophy. 🏆pic.twitter.com/120pGNNKS7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 7, 2024