US Iran War : मध्यपूर्वेतील युद्धाला नवे वळण! इराणने अमेरिकन सैन्याला घेतले ताब्यात? जगभरात खळबळ (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
इराणचे ‘सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे सचिव अली लारीजानी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. लारीजानी यांच्या मते, इराणच्या सैन्याने अनेक अमेरिकन सैनिकांना जिवंत पकडून बंदी बनवले आहे. त्यांनी अमेरिकेवर असाही आरोप केला की, अमेरिका सरकार जगापासून सैन्याच्या अटकेच्या माहिती लपवत आहे. अमेरिकन सैन्य युद्धात मारले गेले नसून, ते इराणच्या ताब्यात आहेत. पण सत्य फार काळ लपून ठेवता येणार नाही असेही त्यांनी म्हटले. मात्र अमेरिकेने हा दावा खोटा असून धुर्त चाल असल्याचे म्हटले आहे. यामुळे दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे.
परंतु अमेरिकेने इराणचा दावा फेटाळला आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) इराणचे हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. माध्यमांशी बोलताना अमेरिकन प्रवक्त्याने सांगितले की, इराण सरकार खोटे दावे करत असून हा त्यांचा धुर्तपणाचा एक नमुना आहेत. अधिकृत माहितीनुसार, इराणच्या कुवेत मधील अमेकिन तळावर झालेल्या हल्ल्यात ६ सैनिक ठार झाले आहे. इराणने कोणत्याही सैनिकाला बंदी बनवलेले नाही.
सध्या इराणच्या या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. खरेच अमेरिकी सैन्य इराणच्या ताब्यात आहे का? अमेरिका जगापासून सत्य का लपवत आहे असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या परिस्थितीमुळे मध्यपूर्वेतील शांतता पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात संयुक्त लष्करी कारवाई केली होती. तेव्हापासून या संघर्षाने जागतिक स्तरावर अनेक क्षेत्रात परिणाम झाला आहे. यामुळे अनेक तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
Ans: इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरीटी कौन्सिलचे सचिव अली लारिजानी यांनी अमेरिकन सैन्याला बंद बनवल्याचा दावा केला आहे.
Ans: सैन्याला बंदी बनवण्याच्या इराणच्या दाव्याला अमेरिकेने फेटाळले असून हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे.
Ans: सध्या मध्यपूर्वेत इराण-अमेरिकेत एकमेकांवर हल्ले सुरुच आहेत. यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.






