फोटो सौजन्य - Punjab Kings/KolkataKnightRiders सोशल मीडिया
KKR vs PBKS Toss Update : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये आज दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये लढत सुरु झाली आहे. आज अजिंक्य रहाणेच्या संघ आणि श्रेयस अय्यर आमनेसामने असणार आहेत. आजच्या पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आजच्या सामन्यात कोलकाता नाईट राइडर्सचा संघ या प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न करेल तर दुसरीकडे पंजाब किंग्सचा संघ टॉप ४ मध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नांत असेल. आजच्या सामन्यात कोलकाता नाईट राइडर्सच्या फलंदाजीकडे चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे.
आजच्या सामन्यात कोलकाता नाईट राइडर्सने दोन बदल केले आहेत. कोलकता नाईट राइडर्सचे मोईन अली आणि रमनदीप सिंह याला प्लेइंग ११ मधून बाहेर काढण्यात आले आहे. याच्या जागेवर आज रोवमन पॉवेल आणि चेतन साकरिया याना संघामध्ये स्थान मिळाले आहे. तर पंजाब किंग्सच्या संघामध्ये आक ग्लेन मॅक्सवेल याला संघामध्ये स्थान मिळाले आहे.
🚨 Toss 🚨 @PunjabKingsIPL elected to bat against @KKRiders
Updates ▶️ https://t.co/oVAArAaDRX #TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/ccqbIBBKSZ
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2025
कोलकाताने मागील दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे तर पंजाबला मागील सामना बंगळुरूविरुद्ध गमवावा लागला होता. आज श्रेयस अय्यर कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल, त्याचबरोबर संघाचा युवा फलंदाज प्रियांश आर्याच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असेल. अजिंक्य रहाणे संघासाठी चांगली कामगिरी करत आहे पण त्याला संघाची स्थान न मिळाल्यामुळे संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. आज संघामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत त्यामुळे ते कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. एवढेच नव्हे तर केकेआरकडे दोन दमदार फिरकी गोलंदाज आहेत, आज अजिंक्य रहाणे सुनील नारायण आणि वरूण चक्रवर्ती यांना दोघांना वापर करेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
IPL 2025 च्या पॅाइंट टेबलमध्ये या संघांमध्ये प्लेऑफसाठी रस्सीखेच! जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती
श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), जोश इंग्लिश, नेहल वढेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, माकों यान्सन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, अजमततुल्लाह उमरजाई
इम्पॅक्ट प्लेयर – हरप्रीत ब्रार, मुशीर खान, प्रवीण दुबे, विजयकुमार वैशाख, सुर्यांश शेंडगे
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकिपर), रोवमन पॉवेल, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, हर्षित राणा, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोडा, चेतन साकरिया
इम्पॅक्ट प्लेयर – ऑनरिक नॉर्ख्या, मनिष पांडे, अंगकृष रघुवंशी, अनुकूल रॉय,