फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मिडीया
आयपीएल 2025 आयपीएल 2025 : आज आयपीएल 2025 मध्ये कोलकता नाइट राइडर्स विरूध्द पंजाब किंग्स यांच्यामध्ये लढत होणार आहे. कालच्या सामन्यामध्ये चेन्नई विरूध्द हैदराबाद यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात हैदराबादने विजय मिळवून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. यामध्ये चेन्नईच्या संघाचा पराभव झाला त्यामुळे संघ जवळजवळ प्लेऑफमधून बाहेर झाला आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी 6 संघामध्ये जोरदार लढत सुरु आहे. या सिझनमध्ये गुजरात, दिल्ली, मुबंई, बंगळुरु, पंजाब आणि लखनऊ हे संघांमध्ये सध्या प्लेऑफसाठी शर्यत सुरू आहे. सध्या गुणतालिकेची स्थिती आहे यासंर्दभात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आयपीएल 2025 च्या गुणतालिकेवर नजर टाकली तर या सिझनमध्ये गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. गुजरातच्या संघाने आतापर्यत 8 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 6 सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. 12 गुणांसह गुजरातचा संघ पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या मागोमाग दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचे समान गुण आहेत. गुजरात टायटन्सचा रन रेट दिल्ली कॅपिटल्सहुन अधिक असल्यामुळे गुजरातचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर रॅायल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आहे. बंगळुरुच्या संघाने 9 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 6 सामन्यात विजय मिळाला आहे तर 3 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.
चौथ्या स्थानावर मुबंई इंडीयन्सचा संघ आहे, संघाने दमदार कमबॅक केला आहे. मुबंईने 9 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 5 सामन्यात विजय मिळाला आहे तर 4 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्सचा संघ आज कोलकताशी सामना करणार आहे. सध्या पाचव्या स्थानावर आहे. पंजाबने 8 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 3 पराभवांना सामोरे जावे लागले आहे, तर 5 विजय हाती लागले आहेत. लखनऊ सुपर जायंट्स सहाव्या स्थानावर आहे. लखनऊ सुपर जायंट्सने 9 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 5 विजय मिळाले आहेत तर 4 पराभवांना सामोरे जावे लागले आहे.
IPL 2025 POINTS TABLE. 📈
– RR & CSK at No.9 and No.10 with 4 Points each. pic.twitter.com/qdNdOOoEBt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 25, 2025
कोलकताच्या संघाला पुढील सर्व सामने जिकणे अनिवार्य आहे. कोलकता नाइट राइडर्सने 8 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 5 पराभवांना सामोरे जावे लागले आहे तर 3 सामन्यात त्यांचा विजय झाला आहे. सनराइझर्स हैदराबादचा संघ या सिझनमध्ये विशेष कामगिरी करू शकले नाही. त्यांचे 9 सामने झाले आहेत यात त्यांना 6 पराभवांना सामोरे जावे लागले आहे तर 3 सामन्यात त्यांचा विजय झाला आहे. राजस्थान रॅायल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या प्लेऑफ आशा संपुष्टात आल्या आहेत. राजस्थानचा संघ नवव्या स्थानावर तर चेन्नईचा संघ दहाव्या स्थानावर आहे.