मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल (KLRahul) या दोघांचं नातं हे कोणापासूनही लपून राहिलेली नाही. लवकरच या नात्याला अथिया आणि राहुल हे दोघे लग्नाचं नाव देणार असून कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित एक ग्रँड लग्न सोहोळा पारपडणार असल्याची माहिती मिळत आहे.
आथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल हे दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघही मीडियामध्ये एकमेकांबद्दल बोलणे टाळतात, परंतु दोघेही सोशल मीडियाद्वारे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. लग्न सोहळ्यासाठी त्यांनी एका खास ठिकाणाची निवड केली आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, त्यांचे लग्न एखाद्या महागड्या रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये होणार नसून, खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) बंगल्यात होणार आहे. सुनील शेट्टीच्या बंगल्याचे नाव ‘जहाँ’ असे आहे. केएल राहुल आणि अथिया या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्न बंधनात अडकू शकतात. खंडाळ्यातील हा बंगला सुनील शेट्टी यांच्यासाठी देखील खूप खास आहे. त्यांनी १७ वर्षांपूर्वी हा बंगला बांधला आहे. खंडाळास्थित हा बंगला मोठ्या परिसरात पसरलेला असून, त्याच्या आतील भागात अनेक झाडे लावण्यात आली आहेत. अथिया आणि राहुल यांच्या लग्नात सहभागी होणार्या पाहुण्यांना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपला वेळ राखून ठेवावा, असे सांगण्यात आल्याचे कळते आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनंतर अथिया शेट्टी आणि राहुल यांचे बॉलिवूड-क्रिकेट जगतातील दुसरे ग्रँड लग्न असणार आहे.
अथिया शेट्टी (Athiya Shetty) अनेकदा केएल राहुलसोबत क्रिकेट टूरवर जाताना दिसते. दोघेही एकमेकांना मागील 3 वर्षांपासून डेट करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार केएल राहुल आणि अथिया शेट्टी दोघेही एकत्र एकाच घरात शिफ्ट झाले आहेत. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे बोलले जात आहे. त्यांना वांद्रे येथील कार्टर रोडवर एक घर घेतले आहे. ही जोडी त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाल्यापासून लग्नाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.