केएल राहुलचा वाढदिवस : लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलचा आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या जावईला सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुनील शेट्टी नेहमीच्या त्याचा जावई केएल राहुल बद्दल कौतुक करत असतो. त्याचबरोबर तो त्याला त्याच्या कामगिरी बद्दल सुद्धा सोशल मीडियावर भरभरून कौतुक करतो. अभिनेता सुनील शेट्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुनील शेट्टी, त्याचा मुलगा अहान शेट्टी आणि केएल राहुल दिसत आहेत.
सुनील शेट्टीची इंस्टाग्राम पोस्ट
सुनील शेट्टीने फोटो शेअर करताना एक सुंदर कॅप्शन लिहिले आहे. त्याने लिहिले, “आपल्या आयुष्यात काय आहे याने काही फरक पडत नाही, आपल्या आयुष्यात कोण आहे हे महत्त्वाचे आहे… तू माझ्यासोबत आहेस यात मला धन्यता वाटते कारण ते असे नाते आहे जे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. व्यक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा.
सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि के एल राहुलने २०२३ 23 जानेवारी 2023 रोजी केएल राहुलने अथिया शेट्टीशी लग्न केले. अथियाचे वडील सुनील शेट्टी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर दोघांचे लग्न झाले. अथिया राहुलला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियम येत असते.