कुलदीप यादव : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. या सामान्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आजच्या सामन्यामध्ये कोणत्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. सामन्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. न्यूयॉर्कमधील खेळपट्टीबद्दल विचार केला तर आतापर्यत या खेळपट्टीवर गोलंदाजांना जीवनदान मिळाले आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही संघ सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. आजच्या सामन्यात भारताचा वरचष्मा असेल कारण भारताच्या संघाचा विश्वचषकामध्ये पाकिस्तानविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे.
पहिल्या सामन्यामध्ये म्हणजेच भारत विरुद्ध आयर्लंड या सामन्यात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युझवेन्द्र चहलला वगळण्यात आले होते. परंतु आजच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होऊ शकतो. कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. कुलदीप प्लेइंग इलेव्हनमध्ये राहिला तर पाकिस्तानच्या अडचणी वाढू शकतात. (फोटो सौजन्य – BCCI X अकाउंट)
[read_also content=”भारताच्या लेकीनं इतिहास घडवला, UFC मध्ये पदार्पण करून विजय मिळवणारी पहिली महिला https://www.navarashtra.com/sports/puja-tomar-the-first-woman-to-win-in-her-ufc-debut-made-history-from-india-545007.html”]
नजर टाका कुलदीपच्या रेकॉर्डवर…
नुकताच पार पडलेला आयपीएल 2024 मध्ये कुलदीप यादवने दिल्ली कॅपिटल्ससाठी दमदार कामगिरी केली. जर कुलदीपचा पाकिस्तानविरुद्ध रेकॉर्ड पहिला तर त्याने आतापर्यत पाकिस्तानविरुद्ध 6 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 12 विकेट्स घेतले आहे. त्याच बेस्ट रेकॉर्ड पाहिला तर तुम्ही सुद्धा थक्क व्हाल 25 धावांत 5 विकेट घेणे ही कुलदीपची सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. कुलदीपला अद्याप पाकिस्तानविरुद्ध T-20 खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण ते न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरू शकतो. कुलदीप खेळला तर तो पाकिस्तानसाठी जीवघेणा ठरू शकतो.
कुलदीपची T-20 आंतरराष्ट्रीय कामगिरी
कुलदीपच्या T-20 आंतरराष्ट्रीय कामगिरीवर नजर टाकली तर ती अत्यंत आकर्षित आहे. कुलदीपने आतापर्यंत 35 सामने खेळले आहेत. या कालावधीत 59 विकेट्स घेतल्या आहेत. 17 धावांत 5 विकेट घेणे ही त्याची सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. कुलदीपच्या एकूण T20 विक्रमावर नजर टाकली तर त्याने 156 सामन्यांमध्ये 190 विकेट घेतले आहेत.