फोटो सौजन्य - punjabkingsipl/SunRisers Hyderabad सोशल मीडिया
SRH vs PBKS toss Update : आज आयपीएलच्या सुपर शनिवारमध्ये दोन सामने खेळवले जात आहेत. यामध्ये पहिला सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सुरु आहे. तर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होणार आहे. आजच्या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यांमध्ये प्रियांश आर्याने संघासाठी शतक झळकावले होते त्यामुळे आज तो कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने कमिंडू मेंडिसने संघासाठी काही विशेष कामगिरी केली नाही त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच्या जागेवर इशान मलिंगाला संघामध्ये स्थान मिळाले. पंजाब किंग्सच्या संघाने संघामध्ये कोणताही बदल केला नाही. पंजाब किंग्सचा संघ दमदार फॉर्ममध्ये आहे त्यामुळे आज पंजाबच्या फलंदाजीवर चाहत्यांचे विशेष लक्ष असेल. तर आज हैदराबादच्या होमग्राउंडवर आज सामना आहे त्यामुळे संघ आज मैदानात कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल.
पंजाब किंग्सचा या वर्षी कर्णधार बदलला आहे. संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कमालीची फलंदाजी करत आहे. त्याचबरोबर संघाचे प्रशिक्षक देखील बदलले आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने आतापर्यत ४ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी ३ विजय मिळवले आहेत आणि १ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादचा संघ कागदावर मजबूत दिसत होता पण त्यांनी चाहत्यांना प्रचंड निराश केले आहे. संघाने आतापर्यत ५ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना फक्त पहिल्या राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे त्यानंतर सलग चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
🚨 News from Hyderabad 🚨@PunjabKingsIPL elected to bat against @SunRisers in Match 2⃣7⃣
Updates ▶️ https://t.co/RTe7RlXDRq #TATAIPL | #SRHvPBKS pic.twitter.com/4wdG7f9eaE
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॉन्सन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल.
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी, इशान मलिंगा.