रोहित शर्मा,वीरेंद्र सेहवाग आणि श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मीडिया)
LSG vs PBKS : आयपीएल २०२५ चा ५४ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पंजाब किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने प्रभसिमरन सिंगच्या ४८ चेंडूत ९१ धावांच्या जोरावर लखनौला २३६ धावांचा डोंगर उभा केला. प्रभसिमरन सिंगने आपल्या ९१ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ७ षटकार लागवले. याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यरने देखील २५ चेंडूत ४५ धावांची वेगवान खेळी सकराळी. प्रत्युउत्तरात एलएसजीचा संघ केवळ १९९ धावाचा करू शकला. एलएसजीकडून आयुष बडोनी (४० चेंडू ७४धावा) आणि अब्दुल समद (२४ चेंडूत ४५धावा) यांची झुंज संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली आणि परिणामी पंजाबने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ३७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने एक खास विक्रम रचला आहे. त्याने टीम इंडियाचे माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनाही मागे टाकले आहे.
श्रेयस अय्यरने आयपीएलमधील त्याच्या छोट्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत शानदार कामगिरी केली आहे. तो अशा काही निवडक खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांनी तीन-तीन संघांचे नेतृत्व केले आहे, तर दोन संघांना आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचवणारा तो एकमेव कर्णधार आहे. याशिवाय, अय्यर आता कर्णधारासोबतच बॅटनेड देखील चमत्कार करून दाखवला आहे. या कामगिरीसह तो महान खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. श्रेयस अय्यर आता आयपीएलमध्ये कर्णधार असताना एका हंगामात सर्वाधिक वेळा ४०० धावा करणारा संयुक्त तिसरा फलंदाज ठरला आहे.
श्रेयस अय्यरने वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजा खेळाडूंना देखील मागे टाकले आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एका हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा आहे. त्याने कर्णधार म्हणून सात वेळा आयपीएलच्या एका हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे. या खास यादीत दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियन दिग्गज डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये एकाच हंगामात पाच वेळा ४०० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. आता श्रेयस अय्यरने चौथ्यांदा ही कामगिरी करून दाखवली आहे. त्याच्यासोबत गौतम गंभीर, एमएस धोनी आणि केएल राहुल यांचाही या यादीत समावेश आहे,
श्रेयस अय्यरने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये ४०५ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५०.६२ राहिली आहे आणि त्याचा स्ट्राईक रेट १८०.८० आहे. या हंगामात आतापर्यंत त्याने २७ चौकार आणि २७ षटकार लागले आहेत. या हंगामात सर्वात जलद स्ट्राईक रेटने ४०० पेक्षा जास्त धावा करणारा अय्यर हा निकोलस पूरन नंतरचा दुसराच फलंदाज ठरला आहे.