वैभव सूर्यवंशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी(फोटो-सोशल मीडिया)
IPL २०२५ : आयपीएल २०२५ मध्ये शतक ठोकून वैभव सूर्यवंशी चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने सर्वात कमी वयात म्हणजे १४ व्या वर्षी टी-२० मध्ये शतक करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील त्याची भुरळ पडली आहे. वैभवच्या या खेळीचे त्यांनी सुद्धा कौतुक केले आहे. बिहारच्या युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इतक्या लहान वयात एवढी मोठी कामगिरी करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. असे म्हणत मोदींनी वैभवचे कौतुक केले.
राजस्थान रॉयल्सकडून खेळताना, वैभवने नुकतीच एक ऐतिहासिक खेळी केली. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावले. वैभवने फक्त ३५ चेंडूत शतक ठोकून अनेक विक्रम रचले. त्याने त्याच्या खेळीत ७ चौकार आणि ११ षटकार लगावले आहेत. वैभवने वयाच्या १४ व्या वर्षी ही कामगिरी करून दाखवली आहे. या कामगिरीने त्याने क्रिकेट जगताला दखल घ्यायला भाग पाडले. त्याने केवळ क्रिकेट जगतात खळबळ माजवली नाही तर देशभरातील लाखो लोकांना हे दाखवून देण्यात तो यशस्वी झाला आहे, की लहान शहरे देखील मोठे स्टार निर्माण करण्याची क्षमता ठेवतात.
बिहारमध्ये होणाऱ्या ‘खेलो इंडिया युथ गेम्स २०२५’ च्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या व्हिडिओ संदेशात वैभवचे कौतुक केले. ते म्हणाले की, ‘मी आयपीएलमध्ये बिहारचा मुलगा वैभव सूर्यवंशीचा शानदार खेळ पाहिला आहे. इतक्या लहान वयात इतका मोठा विक्रम करणे हे सोपे नाही. यामागे त्याची कठोर मेहनत आणि सततचा सराव असल्याचे ते म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, वैभवचे यश तरुणांना शिकवते की कठोर परिश्रम, समर्पण आणि सरावाने कोणतेही ध्येय साध्य करता येऊ शकते.
पंतप्रधानांनी असे देखील असेही म्हटले की, वैभवचे यश हे फक्त एका सामन्याचे फळ नसून त्याचा सततचा सराव, अनेक सामन्यांचा अनुभव आणि स्पष्ट ध्येय यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. त्यांनी सर्व तरुणांना खेळांमध्ये अधिक सहभागी होण्याचा देखील सल्ला दिला, कारण तुम्ही जितके जास्त खेळाल तितके तुम्ही चांगले व्हाल. असे पंतप्रधान म्हणाले.
हेही वाचा : RR vs KKR : मैदानात Riyan Parag ला शतकाची हुलकावणी, तिकडे स्टेडियममध्ये आईच्या डोळ्यात पाणी, फोटो व्हायरल..
मोदी यांच्याकडून संगण्यात आले की, त्यांचे सरकार केवळ क्रिकेटच नाही तर खो-खो, मल्लखांब, योगासन आणि गटका यासारख्या भारतीय पारंपारिक खेळांनाही प्रोत्साहन देत आहे. ते म्हणाले की, आमच्या नवीन शिक्षण धोरणात, देशात चांगले खेळाडू आणि क्रीडा तज्ञ तयार व्हावेत यासाठी खेळांना अभ्यासाचा भाग बनवण्यात आले आहे. असे त्यांनी सांगितले. शेवटी, तरुणांना प्रेरणा देताना पंतप्रधान म्हणाले की, खेळ आपल्याला केवळ जिंकायला शिकवत नाहीत तर टीमवर्क, शिस्त आणि एकत्र पुढे जाण्याची भावना देखील देत असतात.