फोटो सौजन्य - X
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद : आज लखनऊ सुपर जायंट्सचा सामना सनरायझर्स हैदराबाद यांच्या विरुद्ध होणार आहे या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स समोर प्लेऑफचे आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना ऋषभच्या संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने विजय मिळवण्यास संघाच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राहतील. जर संघाचा पराभव झाला तर संघ प्लेऑफमधून बाहेर पडेल सांगायचे झाले तर आज लखनऊ समोर करो या मरो की स्थिती आजच्या सामन्यात आहे.
लखनऊ सुपर जायंट्स कर्णधार ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पण त्याने या सीझनमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. आजच्या सामन्यात ऋषभ पंतवर चाहत्यांची नजर असणार आहे. त्याचबरोबर या सामन्यात ट्रॅव्हिस हेड संघाचा भाग नसणार आहे, त्याच्या जागेवर आजच्या सामन्यात हर्ष दुबेला संघामध्ये स्थान मिळाले आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या संघामध्ये आजच्या सामन्यात विलियम ओरॉकला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याव्यतिरीक्त कोणताही बदल करण्यात आला नाही.
🚨 Toss 🚨@SunRisers won the toss and elected to bowl against @LucknowIPL in Match 6⃣1⃣
Updates ▶️ https://t.co/GNnZh90u7T#TATAIPL | #LSGvSRH pic.twitter.com/upINWS6jsc
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2025
लखनऊच्या संघासाठी हा सामना फारच महत्वाचा आहे. सनराइझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतुन बाहेर झाला आहे. तर लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने या सामन्यात विजय मिळवल्यास संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहिल जर पराभुत झाले तर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होईल. गुणतालिकेमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा संघ सातव्या स्थानावर आहे. संघाचे आतापर्यत 11 सामने झाले आहेत यामध्ये संघाने 5 सामन्यात विजय मिळवला तर 6 सामन्यात त्याचा पराभव झाला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचे सलामीवीर फलंदाज मिचेल मार्श, एडन मारक्रम दोन्ही खेळाडु दमदार फाॅर्ममध्ये आहेत.
ऋषभ पंत (कर्णधार), मिचेल मार्श, एडन मारक्रम, निकलस पुरण, अब्दुल समद, आयुष बडोनी, आकाशदीप, आवेश खान, रवी बिश्नोई, दिग्वेश राठी, विलियम ओरॉक
पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, कमींडू मेंडीस, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जिशान अन्सारी, ईशान मलिंगा