फोटो सौजन्य - IndianPremierLeague
मुकेश कुमार : काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडीयन्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात मुंबईच्या संघाने वानखेडेवर दिल्लीचा पराभव करुन प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. या पराभवासह दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा नष्ट झाल्या आहेत. आज गुजरातच्या संघाचा सामना लखनऊसोबत होणार आहे. कालच्या सामन्यात 18 व्या ओव्हरमध्ये मुकेश कुमार याला मुंबईच्या फलंदाजांनी फारच धुतलं. आता दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.
बुधवारी, दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध ५९ धावांनी सामना गमावला आणि या पराभवासह दिल्ली संघ आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला. या सामन्यानंतर बीसीसीआयने दिल्लीचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारवर दंड ठोठावला आहे. यामागील कारण जाणून घेऊया. आयपीएलच्या एका निवेदनानुसार, दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि त्याला एक डिमेरिट पॉइंट देखील मिळाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान ही घटना घडली.
🚨 #DelhiCapitals pacer Mukesh Kumar has been fined 10% of his match fees, and handed one demerit point for Code of Conduct breach during #MIvsDC game at the Wankhede#MIvDC #CricketTwitter #IPL2025 pic.twitter.com/jUZX3OI6YA
— Cricbuzz (@cricbuzz) May 22, 2025
मुकेश कुमार यांने आयपीएलमध्ये केलेल्या कृत्यामुळे आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा कबूल केला आहे. कलम २.२ मध्ये म्हटले आहे की, “सामनादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणे किंवा फिक्स्चर आणि फिटिंग्जचा गैरवापर”. मुकेश कुमारने आपला गुन्हा कबूल केला आहे आणि सामनाधिकारीने दिलेली शिक्षा स्वीकारली आहे. लेव्हल १ च्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास, मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. याचा अर्थ असा की या निर्णयाविरुद्ध अपील करता येणार नाही.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या १९ व्या षटकात मुकेश कुमार खूप महागडा ठरला, ज्यामध्ये त्याने २७ धावा दिल्या, तेव्हा ही घटना घडली. या षटकानंतर सामन्याचा मार्ग बदलला. मुंबई संघाला १८०/५ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात, कालच्या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. आता संघाचा फक्त शेवटचा सामना शिल्लक आहे.