शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या(फोटो-सोशल मिडिया)
MI vs GT : आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध दारुण पराभव सामोरे जावे लागले. त्यामुळे गुजरात संघाचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. या सामन्यात मुंबईने २० धावांनी विजय मिळवलाया आहे. या दरम्यान हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांच्यातील तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
एलिमिनेटर सामन्यात हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांच्यात असे दोन घटना घडल्या आहेत. त्या दोघांना बघून असे वाटत होते की दोघांमध्ये काही तरी बिनसले आहे. टॉस दरम्यान गिलने हार्दिकशी हस्तांदोलन देखील केले नाही. त्याच वेळी, जेव्हा गिल एलबीडब्ल्यू आउट झाला तेव्हा पंड्याने खूप आक्रमकपणे आनंद साजरा केला. त्याने गिलकडे दुर्लक्ष देखील केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल हे दोघेही भारतीय क्रिकेट संघाचे महत्वाचे खेळाडू आहेत. पण अलिकडेच आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यादरम्यान या दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही असे दिसून आले आहे.
सर्वप्रथम, सामन्यात नाणेफेकीवेळी जेव्हा हार्दिक गिलशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे सरसावला तेव्हा गिल हार्दिकच्या हाताकडे दुर्लक्ष करून हस्तांदोलन न करता पुढे निघून गेल्याचे दिसले. त्याने जाणूनबुजून हार्दिककडे दुर्लक्ष केले असे वाटले. लोकांनी त्याची ही व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आणि लिहिले की दोन्ही खेळाडूंमध्ये काहीतरी गडबड आहे. चाहत्यांनी याला “अहंकाराचा संघर्ष” किंवा “विवाद” असे देखील म्हटले आहे.
Shubman gill involved in ego war with Hardik Pandya 🤪 Hardik tried to shake his hands but Shubman didn’t because of his fragile ego that too in front of the one who made his t20 career.
— Crasher🤴🏾 (@lmao_crx3r) May 30, 2025
यानंतर, जेव्हा गिल फलंदाजी करत होता, तो बाद होताच हार्दिकने आक्रमकपणे जल्लोष साजरा करायला सुरवात केली. हार्दिक गिलसमोर जोमाने जल्लोष करताना दिसून आला. हार्दिकचा जल्लोष नेमका कसा होता? त्यात विकेट घेतल्याचा आनंद होता की गिलबद्दलचा काही अनबन होती? यावर आता शंका घेऊ लागली आहे. या दोन कारणांमुळे, गिल आणि हार्दिकमध्ये खरोखरच सर्व काही ठीक आहे ना? याबद्दल अंदाज लावले जात आहेत.
३० मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने गुजरातचा २० धावांनी पराभव केला. या पराभवाने गुजरात टायटन्सचे या स्पर्धेतील प्रवासाचा शेवट झाला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात मुंबईचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २२८ धावा केल्या. प्रत्युउत्तरात गुजरात टायटन्स २०८ धावा करू शकला. परिणामी मुंबईकडून २० धावांनी पराभूत व्हावे लागले.