फोटो सौजन्य : Punjab Kings/Mumbai Indians
मुबंई इंडीयन्स विरुद्ध पंजाब किंग्स टाॅस अपडेट : मुबंई इंडीयन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये आज लढत होणार आहे. हा सामना दोन्ही संघाचा या सिझनचा शेवटचा साखळी सामना असणार आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी फारच महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यामध्ये दोन्ही संघासाठी पहिल्या स्थानावर जाण्यासाठी लढणार आहेत. आजच्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या संघाला मागिल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडुन पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पंजाब किंगच्या संघामध्ये झालेल्या बदल मध्ये युझवेंद्र चहल याला आजही संघामध्ये स्थान मिळाले नाही. मागील सामन्यात दुखापतीमुळे संघाबाहेर होता आजही तो याच कारणामुळे संघाबाहेर आहे. त्याच्यात जागेवर आजच्या सामनात पुन्हा एकदा हरप्रीत ब्रार याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्सच्या संघामध्ये प्रभसीमरण याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघामध्ये सामील करण्यात आले आहे. विजयकुमार वैशांक याला देखील आज संघामध्ये प्लेइंग इलेव्हनचा हिस्सा बनवण्यात आले आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये एक बदल करण्यात आला आहे अश्विनी कुमार याला आज इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघामध्ये सामील करण्यात येणार आहे याव्यतिरिक्त संघामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL won the toss & opted to bowl first against @mipaltan.
Updates ▶ https://t.co/Dsw52HOtga#TATAIPL | #PBKSvMI pic.twitter.com/Pbmm2rkM9w
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2025
मुबंई इंडीयन्सचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव हा दमदार फार्ममध्ये आहे. त्याने या सिझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे त्यामुळे आजच्या सामन्यात तो कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक असेल. जसप्रीत बुमराहवर चाहत्यांची नजर असणार आहे, त्याने मागिल सामन्यात कमालीची कामगिरी केली आहे. पंजाबच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर श्रेयस अय्यरने अर्धशतक ठोकले होते.
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, टिळक वर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), नमन धीर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर
इम्पॅक्ट प्लेअर : अश्वनी कुमार, काॅर्बिन बाॅश, कर्ण शर्मा, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू
23.75 कोटी रुपयांच्या किमतीमुळे व्यंकटेश अय्यरवर आला दबाव? अजिंक्य रहाणेने सांगितले कारण
श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्या, जोश इंग्लिस (विकेटकिपर), मार्कस स्टॉयनिस, नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्को जॉन्सन, हरप्रीत ब्रार, काइल जैमिसन, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशांक
इम्पॅक्ट प्लेअर : प्रभसिमरन सिंग, सुर्यांश शेडगे, मुशीर खान, प्रवीण दुबे