फोटो सौजन्य - सोशल मिडिया
बीसीसीआयचे नवे अध्यक्ष कोण असणार? : आयसीसीचे आताचे अध्यक्ष जय शाह हे आधी बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्याच्या पदावर आतापर्यत कोणाचीही निवृती केली नाही, आता बीसीसीआयच्या अध्यक्षाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मन्हास बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. बीसीसीआयचे प्रमुख होण्याच्या शर्यतीत जम्मू-काश्मीरमध्ये जन्मलेल्या या क्रिकेटपटूचे नाव अव्वल स्थानावर आहे. २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर मिथुन मन्हास यांचे नाव पुढे आले आहे.
तथापि, आतापर्यंत बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून मिथुन मन्हास यांचे नाव जाहीर केले जाऊ शकते अशी बातमी आहे. जर मन्हास अध्यक्ष झाले तर पहिल्यांदाच एखादा अनकॅप्ड खेळाडू बीसीसीआयचा कार्यभार स्वीकारेल. मिथुन मनहास सध्या जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रशासक म्हणून काम करतात. त्यापूर्वी त्यांनी दुलीप ट्रॉफीमध्ये नॉर्थ झोनचे संयोजक आणि आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्ससाठी सपोर्ट स्टाफ सदस्य म्हणून काम केले होते.
🚨 THE NEW BCCI PRESIDENT. 🚨
– Mithun Manhas likely to become the new BCCI president. (Vaibhav Bhola). pic.twitter.com/wEkDKcDObN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 20, 2025
बीसीसीआय अध्यक्षपदासाठी मिथुन मनहास यांचे नाव आश्चर्यकारक उमेदवार म्हणून पुढे आले आहे. बीसीसीआय अध्यक्षपदासाठी सुरुवातीला माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचे नाव चर्चेत होते. तथापि, आता मिथुन मनहास जवळजवळ निश्चित असल्याचे दिसून येत आहे. ते रॉजर बिन्नीची जागा घेतील, ज्यांना ७० वयोमर्यादेमुळे पद सोडावे लागले आहे. रॉजर बिन्नीपूर्वी सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष होते. याचा अर्थ मिथुन मनहास हे बीसीसीआयचे नेतृत्व करणारे तिसरे क्रिकेटपटू असतील.
जर मिथुन मनहास बीसीसीआयचे अध्यक्ष झाले तर पहिल्यांदाच एखाद्या अनकॅप्ड क्रिकेटरने हे पद भूषवले असेल. याचा अर्थ असा की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळताही मिथुन मनहास बीसीसीआयचे अध्यक्ष होणारे पहिले क्रिकेटपटू असतील. त्यांनी १५७ प्रथम श्रेणी सामने, १३० लिस्ट ए सामने आणि ९१ टी-२० सामने खेळले आहेत. या सर्व फॉरमॅटमध्ये, मिथुन मनहासने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जवळपास १५,००० धावा केल्या आहेत.
मिथुन मनहास बीसीसीआयचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशिवाय, राजीव शुक्ला बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून कायम राहतील असे मानले जाते. रघुराम भट्ट यांना खजिनदार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. प्रभतेज भाटिया संयुक्त सचिवपद भूषवतील, तर अरुण कुमार धुमल हे आयपीएल अध्यक्षपदही कायम ठेवतील. याशिवाय देवजीत सैकिया हे बीसीसीआयचे सचिवही असतील.