फोटो सौजन्य – सोशल मिडीया
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांवर भारतामध्ये पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आता पाकिस्तान भारतीय सरकारने इशारा दिला आहे. सध्या वर्ल्ड चॅम्पियनशिप लिजेंड्स सुरु आहे यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला होता, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला आहे. काही तासांपुर्वी आशिया कपचे वेळापत्रक जाहीर केले आहे त्यानंतर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात वाद सुरु झाला आहे.
आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, यावेळी आशिया कप UAE मध्ये खेळला जाईल. त्याचबरोबर या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. आता चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की टीम इंडिया आशिया कपमध्ये पाकिस्तानसोबत सामना खेळेल का, कारण अलीकडेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मध्ये इंडिया चॅम्पियन्सच्या खेळाडूंनी पाकिस्तानसोबत सामना खेळण्यास नकार दिला होता. त्याचवेळी, टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे.
भारत आणि पाकिस्तान १४ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मध्ये एकमेकांसमोर येतील. आता या सामन्याबद्दल पीटीआयशी बोलताना मोहम्मद अझरुद्दीन म्हणाले, “जर तुम्ही द्विपक्षीय मालिका खेळत नसाल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही खेळू नये असे माझे मत आहे. एकतर सर्व काही घडले पाहिजे किंवा काहीही घडू नये, परंतु सरकार आणि बोर्ड जे काही ठरवेल ते होईल.”
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ बद्दल अझरुद्दीन म्हणाले, “लीजेंड्स लीग ही अधिकृत स्पर्धा नाही. तिचा आयसीसी किंवा बीसीसीआयशी काहीही संबंध नाही. त्यासाठी आयसीसी किंवा बीसीसीआयची परवानगी आवश्यक नाही. ही स्पर्धा खाजगीरित्या खेळली जाते, परंतु आशिया कप आशियाई क्रिकेट परिषदेद्वारे आयोजित केला जातो.”
VIDEO | Asia Cup 2025: Former cricketer and Indian captain Mohammad Azharuddin (@azharflicks), on India, Pakistan being placed in the same group, says, “This is ACC’s event, so I can’t say anything on this. However, I think that if we are not playing any bilateral then we should… pic.twitter.com/zK048Ow3N8 — Press Trust of India (@PTI_News) July 27, 2025
भारत आणि पाकिस्तानमधील बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे, गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही संघांमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेलेली नाही. भारत आणि पाकिस्तानमधील शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२-१३ मध्ये खेळली गेली होती, जेव्हा पाकिस्तान संघ भारतात आला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संताप आहे, ज्याचा परिणाम आता क्रीडा क्षेत्रावरही दिसून येत आहे.