मोहम्मद शमी(फोटो-सोशल मीडिया)
Mohammed Shami finally returns to the field : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या क्रिकेट मैदानापासून दूर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. आयपीएलनंतर त्याने एक देखील सामना खेळलेला नाही. आता बंगाल क्रिकेट असोसिएशनने आगामी हंगामासाठी ५० खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये शमीचे देखील नाव जाहीर करण्यात आले आहे. या यादीत २०२५-२६ च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी मोहम्मद शमीचा या यादीत समावेश केला गेला आहे. याशिवाय आणखी काही भारतीय खेळाडूंचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.
बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि अव्वल क्रमांकाचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन यांचा देखील समावेश आहे. हे दोघे सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहेत. त्याशिवाय बंगालच्या अनेक स्टार खेळाडूंना या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज मुकेश कुमार, फलंदाज अनुस्तुप मजुमदार, फिरकी गोलंदाजी अष्टपैलू शाहबाज अहमद आणि यष्टिरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल हयांचा देखील संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश आहे.
हेही वाचा : हार्दिक पंड्या मुलगा अगस्त्यसोबत झाला भक्तीत लीन; बाप-लेकाने गायले भजन; पहा व्हिडिओ
मोहम्मद शमीचा दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावर संघात समावेश करण्यात आलेला नव्हता. आयपीएल दरम्यान काही सामन्यांमध्ये शमीला दुखापत झाली होती. आयपीएल २०२५ मध्ये त्याची कामगिरी सरासरीपेक्षा खूप वाईट राहिली होती. त्यामुळे भारतीय संघाने मोहम्मद शमीसोबत कोणता एक धोका पत्करला तयारी दाखवली नाही. शमी शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी खेळला होता. शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाच सामन्यांमध्ये ९ विकेट्स घेतल्या. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. त्याच वेळी, शमीने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात २४ विकेट्स काढल्या होत्या. त्यानंतर त्याला शस्त्रक्रिया करावी लागली होती.
मोहम्मद शमी हा २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या हंगामातील पहिल्या स्पर्धेत दुलीप ट्रॉफीमध्ये पूर्व विभागाकडून खेळण्याची शक्यता आहे. जर सर्व काही ठीक राहिले, तर ही स्पर्धा शमीच्या स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी चांगले चिन्ह ठरू शकते. घोट्याच्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर शमीने या वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी शेवटचा खेळला आहे.
हेही वाचा : पंड्याचा पुन्हा Heartbreak! आता जास्मिननेही सोडली साथ; दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो..
मोहम्मद शमी, अभिमन्यू इसवरन, अनुस्तुप मजुमदार, सुदीप चॅटर्जी, सुदीप कुमार घरामी, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), शाकीर हबीब गांधी (यष्टीरक्षक), काझी जुनैद सैफी, शाहबाज अहमद, दीप कुमार सिंधू, प्रदिप्ता प्रामाणिक, रितिक चॅटर्जी, आकाश कुमार सिंधू, कृष्ण कुमार, आय. पोरेल, मोहम्मद कैफ, सुभम चॅटर्जी, सुमंत गुप्ता, चिन्मय जैन,अंकुर पॉल, राहुल कुंडू, आदित्य पुरोहित, रणजोत सिंग खैरा, गौरव सिंग चौहान, सौरभ कुमार सिंग, ऐशिक पटेल, प्रियांशू श्रीवास्तव, अंकित चॅटर्जी, सक्शम चौधरी, विशारद चौधरी (विशाल चौधरी), राहुल कुंडू, नुरुद्दीन मंडल, आदित्य पुरोहित. चौधरी, राजू हलदर, श्रेयन चक्रवर्ती, सौरव हलदर, राहुल प्रसाद, अंकित मिश्रा, विशाल भाटी, रोहित, रोहित कुमार, ऋषभ विवेक,सुभम सरकार, सुमित मोहंता, कनिष्क सेठ, संदीपन दास (ज्युनियर), सायन घोष,सौम्यदीप मंडल आणि युधाजित गुहा.