मुंबई विरुद्ध पंजाबमध्ये रंगणार महामुकाबला (फोटो- @mufaddal_vohra/ट्विटर)
Mumbai Indians Vs PBKS: आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्वालिफायर २ चा थरार रंगणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात फायनलला जाण्यासाठी महामुकाबला होणार आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल त्याला फायनलचे तिकीट मिळणार आहे. जो जिंकेल तो संघ ३ जून रोजी बंगलोरच्या संघाविरुद्ध फायनल खेळणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामना आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पोचणार आहे. आजचा सामना हा रोमांचक होण्याची शक्यता आहे.
क्वालिफायर १ मध्ये बंगलोरच्या संघाने पंजाबचा दारुण प्रभाव केला होता. तर एलिमिनेटर सामन्यात मुंबईने गुजरातचा पराभव केला आहे. त्यामुळे मुंबईच्या संघामध्ये उत्साहाचे वातावरण पहायल मिळत आहे. तर पंजाब मागील सामना हरून आल्याने त्यांना जिंकण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.
पाऊस झाल्यास काय होणार?
हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर कोणता संघ फायनलमध्ये एन्ट्री करेल हे तुम्हाला माहिती आहे का याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला आज या वृत्तामध्ये देणार आहोत. क्वालिफायर-२ चा हा हाय-व्होल्टेज सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल, तर टॉस संध्याकाळी ७:०० वाजता होईल. तथापि, या महत्त्वाच्या सामन्यात हवामान भूमिका बजावू शकते. हवामान खात्याच्या मते, आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये पावसाची ४० टक्के शक्यता आहे आणि ढगाळ हवामान देखील राहू शकते.
MI VS PBKS सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाची होणार फायनलमध्ये एन्ट्री! जाणून घ्या नियम काय म्हणतो
यावेळी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने क्वालिफायर-२ साठी कोणताही राखीव दिवस निश्चित केलेला नाही. अशा परिस्थितीत, जर सामना रद्द झाला, तर लीग टप्प्यात चांगली कामगिरी करणाऱ्या संघाला म्हणजेच पंजाब किंग्जला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. आयपीएलच्या नियमांनुसार, जर पावसामुळे प्लेऑफ सामने रद्द झाले तर लीग टप्प्यात जास्त गुण आणि चांगला रनरेट असलेला संघ पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतो. पंजाब किंग्जने लीग टप्प्यात मुंबई इंडियन्सपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत तोच संघ अंतिम फेरीत आरसीबीशी सामना करेल.
A BIG DAY FOR PUNJAB KINGS AND MUMBAI INDIANS:
– The winner will meet RCB in the IPL Final. pic.twitter.com/jAN6M9G5RR
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 31, 2025
क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली होती. या सामन्यात पावसाने जर हजेरी लावली नाही तर श्रेयस अय्यरचा संघ हा सामन्यात कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर मुंबई इंडियन्सचा संघ दमदार फॉर्ममध्ये आहे गोलंदाजांनी कालच्या सामन्यात कामगिरी कामगिरी केली आहे त्याचबरोबर फलंदाजांनी देखील त्यांचा फॉर्म दाखवला होता.