फोटो सौजन्य : Mumbai Indians
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स : काल मुंबईच्या संघाने गुजरातच्या संघाला पराभूत करून क्वालिफायर 2 मध्ये स्थान पक्के केले आहे. तर दुसरीकडे बंगळुरुच्या संघाने पंजाबच्या संघाला पराभूत केल्यामुळे पंजाबजा संघ आणखी एकदा क्वालिफायर २ चा सामना खेळणार आहे. 1 जून रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये क्वालिफायर 2 चा सामना खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना दोन्ही संघांसाठी फारच महत्त्वाचा असणार आहे कारण जो संघ या सामन्यात विजयी मिळवेल तो संघ बंगरूच्या संघाविरुद्ध फायनल सामन्यांमध्ये खेळले. दुसरीकडे जो संघ पराभूत होईल तो संघ शर्यतीतून बाहेर होणार आहे.
पण हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर कोणता संघ फायनलमध्ये एन्ट्री करेल हे तुम्हाला माहिती आहे का याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला आज या वृत्तामध्ये देणार आहोत. क्वालिफायर-२ चा हा हाय-व्होल्टेज सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल, तर टॉस संध्याकाळी ७:०० वाजता होईल. तथापि, या महत्त्वाच्या सामन्यात हवामान भूमिका बजावू शकते. हवामान खात्याच्या मते, १ जून रोजी संध्याकाळी अहमदाबादमध्ये पावसाची ४० टक्के शक्यता आहे आणि ढगाळ हवामान देखील राहू शकते.
यावेळी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने क्वालिफायर-२ साठी कोणताही राखीव दिवस निश्चित केलेला नाही. अशा परिस्थितीत, जर सामना रद्द झाला, तर लीग टप्प्यात चांगली कामगिरी करणाऱ्या संघाला म्हणजेच पंजाब किंग्जला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. आयपीएलच्या नियमांनुसार, जर पावसामुळे प्लेऑफ सामने रद्द झाले तर लीग टप्प्यात जास्त गुण आणि चांगला रनरेट असलेला संघ पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतो. पंजाब किंग्जने लीग टप्प्यात मुंबई इंडियन्सपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत तोच संघ अंतिम फेरीत आरसीबीशी सामना करेल.
Next stop: Qualifier 2️⃣ 😍@mipaltan are all set to meet the @PunjabKingsIPL for a ticket to glory 🎟
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQfph#TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/vK0oAjcG5s
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली होती. या सामन्यात पावसाने जर हजेरी लावली नाही तर श्रेयस अय्यरचा संघ हा सामन्यात कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर मुंबई इंडियन्सचा संघ दमदार फॉर्ममध्ये आहे गोलंदाजांनी कालच्या सामन्यात कामगिरी कामगिरी केली आहे त्याचबरोबर फलंदाजांनी देखील त्यांचा फॉर्म दाखवला होता.