नवी मुंबई : दिनांक-शहरातील अग्रणी 500 तरुण खेळाडूंनी आपल्या कौशल्य आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत UBS समर्थित अॅथलेटिक्स किड्स कपने आपल्या ग्रँड मुंबई फायनलचा यशस्वी समारोप जिओ इंस्टीट्यूट अॅथलेटिक सेंटर, उळवे येथे केला. शारीरिक व्यायामाला चालना देत आणि पुढील पिढीतील चॅम्पियन्सना प्रेरित करत पहिल्या सिझनमध्ये या उपक्रमाने तीन शहरांमधील 1,000 शाळांमधून 1,00,000 मुलांना सहभागी करून घेतले. स्पर्धा triathlon-style स्वरूपात होती. त्यामध्ये 60 मी स्प्रिंट, लांब उडी आणि बॉल थ्रो हे प्रकार होते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वेळ, लाईव्ह समालोचन आणि मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून तरुण खेळाडूंना व्यावसायिक क्रीडा वातावरणाचा अनुभव मिळाला. त्यायोगे त्यांना समृद्ध क्रीडा स्पर्धा, कार्यक्रमाचा आनंद घेता आला.
या कार्यक्रमास प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये वर्ल्ड अॅथलेटिक्सचे उपाध्यक्ष आणि माजी-एएफआय (अध्यक्ष) अदिल जे. सुमारिवाला; स्विस बिझनेस हब इंडियाचे प्रमुख फ्लोरिन म्युलर; स्विस-इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन प्रेसिडेंट स्वित्झर्लंड फिलिप एम. राईख; यूबीएस इंडियाचे हेड ग्रुप रिअल इस्टेट आणि सप्लाय चेन अँड चेअरमन हेराल्ड एगर; ऑलिम्पियन आनंद मेनेजेस; नेरोलॅकचे सीएचआरओ सुधीर राणे; रिलायन्स ट्रेझरीचे कश्यप मोदी; डेलॉइट, पार्टनर प्रसाद कुलकर्णी; भायखळा चर्चचे फादर अर्नेस्ट फर्नांडिस; स्ट्रायडर्स हेड कोच संतोष वर्गीस; 100 मी/ 200 मी खेळाडू अमलान बोरगोहाईन; 100mH/लाँग जंप अॅथलीट मौमिता मोंडल हे युवा खेळाडूंच्या यशाचा गौरव साजरा करण्यासाठी उपस्थित होते.
ऑलिम्पिक चॅम्पियन आणि अॅथलेटिक्स किड्स कप ब्रॅंड अॅम्बेसिडर नीरज चोप्रा यांनी अशा प्रकारच्या स्पर्धांच्या परिवर्तनशील प्रभावावर भाष्य केले: “अशा स्पर्धांमधून तरुण खेळाडूंना मिळणारे अनुभव अमूल्य असतात. उत्साह हाताळण्याची, उद्दिष्टे ठरवण्याची आणि स्पर्धा करण्याची शिकवण त्यांना संपूर्ण आयुष्यासाठी तयार करते.”
MI vs GG : WPL 2025 मध्ये हरमनप्रीत कौरचा संघ पहिल्या विजयाच्या शोधत, आज कमबॅक करण्याची सुवर्णसंधी
अॅथलेटिक्स किड्स कप हा उपक्रम मुलांमध्ये वाढणाऱ्या स्थूलतेच्या समस्येवर उपाय म्हणून तयार करण्यात आला आहे. धावणे, उडी मारणे आणि फेकण्याच्या मूलभूत क्रीडा क्रियांद्वारे त्यांना सक्रिय जीवनशैली अंगीकारण्यास प्रेरित करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. शारीरिक तंदुरुस्तीच्या पलीकडे जात या उपक्रमाने शिस्त, चिकाटी, संघभावना आणि नेतृत्व कौशल्ये विकसित करण्यास मदत केली आणि युवा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
समाजाला सक्षम करण्यासाठी आणि युवकांच्या विकासाला चालना देण्यासाठी असलेली आपली बांधिलकी अधोरेखित करत UBS ने अॅथलेटिक्स किड्स कप प्रत्यक्षात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. युवा प्रतिभांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्याची संधी सुनिश्चित करत त्यांच्या सर्वांगीण विकासाला पाठबळ देण्यासाठीचा हा उपक्रम UBS च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.
Dspowerparts चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल श्नकेर या उपक्रमाबद्दल आपला उत्साह व्यक्त करताना म्हणाले, “युवा खेळाडूंमध्ये केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे तर जीवनावश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत करणाऱ्या अशा उपक्रमाचा शुभारंभ करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. अधिक निरोगी, अधिक आत्मविश्वास असलेली पिढी घडवण्यामध्ये अॅथलेटिक्स किड्स कप हे खेळाच्या सामर्थ्याचे उत्तम उदाहरण आहे.”
UBS मधील इंडिया सर्विस कंपनीचे प्रमुख मॅथीअस श्चॅकल आपले विचार प्रकट करताना म्हणाले, “आम्ही भारताच्या भविष्यामध्ये गुंतवणूक करण्यावर विश्वास ठेवतो आणि अॅथलेटिक्स किड्स कप हा उपक्रम युवक विकासाच्या प्रति आमची बांधिलकी दर्शवतो. या युवा खेळाडूंचा उत्साह आणि निर्धार, तसेच मैदानी वातावरणातील ऊर्जा यातून खेळ परिवर्तनशील ठरू शकतात आणि मुलांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास सक्षम करू शकतात या आमच्या विश्वासाला बळकटी मिळते.” पहिल्या सिझनच्या यशस्वी समारोपानंतर, अॅथलेटिक्स किड्स कप आपला दुसरा सिझन एप्रिल 2025 मध्ये सुरू करणार आहे.