फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
नितीश कुमार रेड्डीचे शतक : टीम इंडियाचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु आहे. यामध्ये या चौथ्या कसोटीचा आज तिसरा दिवस आहे यामध्ये भारताचा युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीने त्याचा सर्वात्तम खेळ दाखवून भारतीय क्रिकेट चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी दिली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथी कसोटी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) खेळली जात आहे. शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात पावसाने अडथळा निर्माण केला. पण त्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाला आहे. यानंतर भारताचा युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीने त्याच्या करियरचे पहिले शतक ठोकल आहे.
भारताचा युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीने १७१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले, ज्यात १० चौकार आणि १ षटकार होता. त्याने ८१ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या होत्या पण धीर सोडला नाही. नितीश यांनी विक्रमांची मालिका रचली आहे. ऑस्ट्रेलियात ८ व्या क्रमांकावर किंवा त्याहून खाली फलंदाजी करताना शतक झळकावणारा नितीश पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने २००८ मध्ये ॲडलेड कसोटीत ८७ धावा करणाऱ्या अनिल कुंबळेला मागे टाकले. भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाची सुरुवात पाच गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावांवर केली. ऋषभ पंत (२८) आणि रवींद्र जडेजा (१७) पहिल्या सत्रात पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर नितीश यांनी वॉशिंग्टन सुंदर (५०) यांच्याकडे मोठ्या पद्धतीने पदभार स्वीकारला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी केली आणि भारताकडून फॉलोऑनचा धोका टळला.
फायर नहीं वाइल्डफायर है! 🔥🔥
Nitish Kumar Reddy gets to his maiden CENTURY and what a stage to get it on!
He is now the leading run scorer for India in the ongoing BGT 🙌👏#TeamIndia #AUSvIND https://t.co/URu6dBsWmg pic.twitter.com/J8D08SOceT
— BCCI (@BCCI) December 28, 2024
नितीश आणि सुंदर या जोडीने ऑस्ट्रेलियात आठव्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी करण्याचा भारतीय विक्रम केला आहे. या दोघांनी २००८ मध्ये १२७ धावांची भागीदारी करणारा कुंबळे आणि हरभजन सिंगचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी डावात भारताच्या आठव्या आणि नवव्या फलंदाजांनी ५० हुन अधिक धावा बनवण्याची ही दुसरी वेळ आहे. नितीश आणि सुंदरच्या आधी २००८ मध्ये अनिल कुंबळे (८७) आणि हरभजन (६३) यांनी हा पराक्रम केला होता.
तिसऱ्या दिनाच्या तिसऱ्या सेशनमध्ये अंधारामुळे खेळ थांबण्यात आला आहे. अजूनही भारताचा संघ फलंदाजी करत आहेत. यामध्ये भारताच्या फलंदाजांनी कमाल करून दाखवली. वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियासाठी महत्वाचे अर्धशतक झळकावले तर नितीश कुमार रेड्डीने त्याच्या करियरचे पहिले शतक नावावर केले.