फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
नितीश कुमार रेड्डी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील तिसऱ्या दिनाचा उर्वरित खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. भारताच्या संघाने आजच्या या पहिल्या सेशनमध्ये खराब कामगिरी केली परंतु भारताचा युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरने संघावरच संकट दूर केलं आहे. भारताच्या संघाने सुरुवातीला आजच्या तिसऱ्या दिनी टीम इंडियाचा महत्वाचा फलंदाज रिषभ पंतची विकेट गमावली त्यानंतर काही वेळाने रवींद्र जडेजा सुद्धा पॅव्हेलियनमध्ये परतला. पण भारताचे दोन फलंदाज नितीश आणि सुंदरने त्याच्या कमालीच्या कामगिरीने संघासाठी शतकीय खेळी खेळली आणि संघासाठी महत्वाच्या धावा केल्या आहेत.
आता सध्या नितीश कुमार रेड्डीने त्याचे पहिले कसोटी आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले त्यानंतर त्याचे खास अंदाजात सेलिब्रेशन केले आहे. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘फ्लावर नहीं फायर हूं…’ ‘पुष्पा’ चित्रपटातील प्रसिद्ध संवाद लोकांच्या मनात इतका स्थिर झाला आहे की लोकांना तो बोलण्याचा कंटाळा येत नाही. अलीकडेच मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय संघाचा युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डी यानेही आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावल्यानंतर असेच काहीसे केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नितीश रेड्डी ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये बॅट घेऊन सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. त्याचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांची मनं जिंकत आहे.
“𝙈𝙖𝙞𝙣 𝙟𝙝𝙪𝙠𝙚𝙜𝙖 𝙣𝙖𝙝𝙞!” 🔥
The shot, the celebration – everything was perfect as #NitishKumarReddy completed his maiden Test fifty! 👏#AUSvINDOnStar 👉 4th Test, Day 3 | LIVE NOW! | #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/hupun4pq2N
— Star Sports (@StarSportsIndia) December 28, 2024
नितीश कुमार रेड्डी यांनी मेलबर्नमध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. पहिले अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने पुष्पा चित्रपटाचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या शैलीत सेलिब्रेशन केले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नितीशने पन्नास धावा करताच पुष्पा स्टाईलमध्ये बॅटने सेलिब्रेशन केले. त्याची स्टाईल पाहून चाहते खूश झाले. या चित्रपटातील अल्लूचा डायलॉग ‘फ्लावर नहीं फायर हूं’ आहे. नितीशनेही स्वत:ला ‘फायर’ सिद्ध केले आणि आपल्या फलंदाजीने सुंदरसह भारताला पुन्हा एकदा फॉलोऑनपासून वाचवले.
रेड्डीने ८० चेंडूंचा सामना करत ५० धावा पूर्ण केल्या, ज्यात एक षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. या कसोटी मालिकेदरम्यान पदार्पण करणाऱ्या नितीशने आगामी काळात भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून आपला ठसा उमटवण्यास सज्ज असल्याचे सिद्ध केले. भारतीय संघासाठी नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी क्रीझवर आहे. या दोघांनी मिळून भारताला फॉलोऑनपासून वाचवले. वृत्त लिहेपर्यंत दोघांमध्ये ७८ धावांची भागीदारी पूर्ण झाली आहे. सुंदर (३३) आणि नितीश (६७) धावांवर खेळत आहेत.
सध्या तो तिसऱ्या दिनाच्या खेळानंतर नाबाद आहे, त्याने तिसऱ्या दिनाच्या शेवटची भारतीय संघासाठी ११९ चेंडूंमध्ये ८५ धावा केल्या आहेत तर वॉशिंग्टन सुदंरने ४० धावांची खेळी खेळली आहे. त्याचबरोबर भारताच्या संघाने तिसऱ्या दिनी फक्त २ विकेट्स गमावले आहेत.