फोटो सौजन्य - Cricbuzz
WTC Points Table 2025-27 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जाण्यासाठी संघाची कसरत सुरु आहे, ऑस्ट्रेलिया, इंग्लड त्याचबरोबर न्यूझीलंड, भारत असे इतर अनेक देश त्यांची मेहनत घेत आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचा आतापर्यत त्यांचा दबदबा दाखवला होता. पण आज त्यांना इंग्लंडविरुद्ध मालिकेमध्ये त्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला २०२५-२७ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे.
शनिवारी मेलबर्न येथे झालेल्या अॅशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सने पराभव केला. सध्याच्या अॅशेस मालिकेतील इंग्लंडचा हा पहिला विजय आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने पहिले सर्व तीन सामने जिंकले होते. या पराभवानंतरही ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडने अलीकडेच वेस्ट इंडिजचा पराभव करून दुसरे स्थान मिळवले आहे. इंग्लंडने चालू WTC सायकलमध्ये तिसरा विजय मिळवला आहे. इंग्लंडने पाच सामने गमावले आहेत.
WTC पॉइंट्स टेबलच्या ताज्या अपडेटनुसार, ऑस्ट्रेलिया वर्चस्व गाजवत आहे. ऑस्ट्रेलियाने सात सामने खेळले आहेत आणि फक्त एक गमावला आहे. ऑस्ट्रेलियाने सलग सहा सामने जिंकले आहेत आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रबळ दावेदार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे १०० टक्के WTC पॉइंट्स होते, परंतु आता ते ८५.७१ टक्क्यांवर घसरले आहेत. ७२ सह, ऑस्ट्रेलिया टेबलमध्ये आघाडीवर आहे.
न्यूझीलंड ७७.७८ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ते २०२३ मध्ये चॅम्पियन होते आणि या फेरीतही ते दमदार कामगिरी करत आहेत. न्यूझीलंडने तीन सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि एक बरोबरीत सुटला आहे. त्यांचे २८ गुण आहेत.
England rekindle their #WTC27 campaign with a win at the MCG 👊 More on where each team stands ➡️ https://t.co/IDs8LuwMrB pic.twitter.com/4yY4GnUYS4 — ICC (@ICC) December 27, 2025
भारतीय कसोटी संघ २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. भारताने नऊ सामने खेळले आहेत, त्यापैकी चार जिंकले आहेत आणि तेवढ्याच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. टीम इंडियाचा अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ०-२ असा पराभव झाला आहे. भारताचे ४८.१५ टक्के गुण आहेत आणि ते गुणतालिकेत पाकिस्तानपेक्षा मागे आहे. तथापि, पाकिस्तानने भारतापेक्षा कमी सामने खेळले आहेत. पाकिस्तानने फक्त दोन सामने खेळले आहेत, एक जिंकला आहे आणि एक हरला आहे.






