फोटो सौजन्य - BLACKCAPS सोशल मिडिया
New Zealand vs West Indies 2nd test : न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा दुसरा सामना सध्या सुरु आहे. पहिल्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने दमदार लढाई लढली होती, त्यामुळे सामना ड्राॅ झाला होता. तर पहिल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने कमालीचा खेळ दाखवला आणि या सामन्यात त्यांचा दबदबा पाहायला मिळाला. दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा ९ विकेट्सने पराभव केला. किवींनी कॅरेबियन संघाचे ५६ धावांचे लक्ष्य फक्त एक विकेट गमावून पूर्ण केले.
टॉम लॅथम ९ धावांवर बाद झाला, परंतु डेव्हॉन कॉनवे आणि केन विल्यमसन यांनी संघाला आणखी कोणताही धक्का बसू नये याची खात्री केली. दुसऱ्या डावात, वेस्ट इंडिजचा संघ फक्त १२८ धावांवरच संपुष्टात आला. सात फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. जेकब डफीने चेंडूने कहर केला आणि पाच विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात किवी गोलंदाजांसमोर वेस्ट इंडिजची फलंदाजी पत्त्यांच्या गठ्ठ्यासारखी कोसळली. सात फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले नाहीत. कॅरेबियन संघाकडून कावेम हॉजने सर्वाधिक ३५ धावा केल्या, तर जस्टिन ग्रीव्हजने २५ धावांचे योगदान दिले.
तथापि, इतर कोणत्याही फलंदाजाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही आणि संघ फक्त १२८ धावांवर बाद झाला. ५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली, त्यांनी टॉम लॅथम फक्त ९ धावांवर बाद झाला. तथापि, डेव्हॉन कॉनवे आणि केन विल्यमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३१ धावांची अखंड भागीदारी करत शानदार विजय मिळवला.
न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना जेकब डफीने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर कहर केला. डफीने १७.२ षटकांत ३८ धावा देत पाच बळी घेतले, तर मायकेल रेने तीन बळी घेतले. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात २०५ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात, किवींनी २७८ धावा करून त्यांच्या पहिल्या डावाच्या आधारे ७३ धावांची आघाडी घेतली.
His second five-wicket-haul in two Tests, congratulations Jacob Duffy 🖐/38#NZvWIN pic.twitter.com/CIF350Yt9d — BLACKCAPS (@BLACKCAPS) December 12, 2025
या विजयासह, न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरी कसोटी आता १८ डिसेंबर रोजी होणार आहे. शाई होप आणि जस्टिन ग्रीव्हज यांच्या द्विशतकांमुळे वेस्ट इंडिजने पहिली कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवले.






