शोएब अख्तर(फोटो-सोशल मीडिया)
Shoaib Akhtar’s big statement against Pakistan : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात नुकतीच दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तान संघाने जिंकला असला तरी दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना आशा होती की पाकिस्तानी संघ घरच्या भूमीवर चांगली कामगिरी करेल आणि दोन्ही सामने जिंकेल.परंतु, त्यांच्या पदरी निराशा आली. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली आहे. पाकिस्तानच्या कामगिरीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने संताप व्यक्त केला.
हेही वाचा : Aus vs Ind 3rd ODI : दोन ‘डक’ विसरून विराट रचणार इतिहास! किंग कोहली ‘हा’ मेगा रेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठ्यावर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर, जेव्हा माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला पाकिस्तान संघाच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो नाराज दिसून आला. पीटीव्ही स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अख्तर म्हणाला की, “जिंकण्यासाठी फिरकी… वाजिदने म्हटल्याप्रमाणे, नाणेफेक जिंकल्यानंतर फिरकी जिंकण्यासाठी होती. जर त्यांना चौथा डाव हवा होता तर आपण ते करू शकत नाही. कसोटी सामन्याच्या चौथ्या डावासाठी आपल्याला पैसे देण्यात येत नाही का? एक छोटीशी भागीदारी देखील शक्य झाली असती. जर रबाडा भागीदारी करू शकला तर काही देखील शक्य आहे.
एवढेच नाही तर एब अख्तरकडून कसोटी क्रिकेटवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शोएब अख्तरला असा विश्वास वाटतो की, की आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानसोबत भेदभाव करण्यात येतो. संभाषणादरम्यान तो म्हणाला की, “दोन कसोटी सामन्यांनी नेमके काय साध्य करता येईल मित्रा? संपूर्ण जग दरवर्षी किमान तीन कसोटी सामने तरी खेळत असते. आपल्याला दोनच सामने खेळायला मिळतात. हा एक मोठा आशीर्वादच आहे.”






