विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जर त्याने विराट कोहलीने ‘ती’ गोष्ट साध्य केली, तर दोन वेळा शून्यावर बाद झालेला विराट कोहली विस्मरणात जाऊन, तो पुन्हा कौतुकात सामील होणार आहे आणि कोहली हे करू शकतो कारण, विराट कोहलीची कामगिरी बघता तो ही सहज साध्य करू शकतो.
जर माजी कर्णधार विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यात काही धावा काढण्यात यश मिळवले असते तर त्याला विक्रमाजवळ पोहचण्यास अधिक मदत झाली असती. परंतु विराट कोहली पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भोपळा देखील फोडू शकला नाही. आता तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने जर ५४ धावा केल्या तर कोहलीसाठी हा आकडा त्याला एकदिवसीय इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचवेल.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने खेळवण्यात आले असून या मालिकेतील एक सामना बाकी असून या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात येणार आहे. दरम्यान भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाकडून त्यांच्या संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. २९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यासोबतच टी-२० मालिकेसाठी हे बदल करण्यात आले






