रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
मुंबई : भारताचा वनडे क्रिकेटचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यापासून तो चांगलाच चर्चेत आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यातील एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत. तो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्य होईल तसेच तुम्हाला लोटपोट हसू देखील येईल.
काही दिवसांपूर्वी म्हणजेच ७ मे रोजी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या या अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तथापि, सद्या रोहित आयपीएल २०२५ मध्ये खेळत आहे. १७ मे पासून सीझन-१८ पुन्हा सुरू होणार आहे. ज्यामध्ये हिटमॅन पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो खेळाडूंशी घाणेरडे बोलले पाहिजेत असे काही बोलताना दिसत आहे.
रोहित शर्माचे मैदानावर खेळाडूंना फटकारतानाचे देखील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु, रोहितचा सध्या व्हायरल होत असणारा व्हिडिओ एका मुलाखती दरम्यानचा आहे. जिथे, रोहित शर्मा म्हणत आहे की, खेळाडूंशी घाणेरडे बोलले पाहिजे.
या दरम्यान रोहितने लगेच त्या घाणेरड्या गोष्टीचा अर्थ देखील स्पष्ट केला आहे. तो म्हणाला आहे की, “तुम्हाला जेवण दिलं नाही का?” ज्याला अँकर उत्तर देतो, टफ कॉल्स. त्यानंतर रोहित म्हणतो, की “तू नेहमीच चुकीचा विचार करतोस मित्रा” त्यानंतर तो अँकर हसायला लागतो.
Rohit: “Players ke sath gandi baatein karni chahiye” 😭🙏pic.twitter.com/exGBTJuQ2N
— Shikha (@Shikha_003) May 13, 2025
रोहित शर्माचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. रोहित शर्मा अनेकदा अशा मजेदार कमेंट्स करत असतो. जे चाहत्यांनाही खूप आवडत आले आहे. चाहतेही हा व्हिडिओ पाहून खूप आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.
अधिकच्या माहितीसाठी , आयपीएल २०२५ नंतर टीम इंडिया इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. जी २० जूनपासून सुरू होणार आहे.रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निर्णयामुळे त्याचे चाहते खूप निराश झालेचे दिसत आहेत. कारण सर्वांना वाटत होते की तो इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत भाग घेईल परंतु या मालिकेपूर्वी त्याने आपली निवृत्ती जाहीर केली.यावेळी रोहित शर्माने केवळ कसोटी कर्णधारपद सोडले नसून संपूर्ण कसोटी क्रिकेटलाच अलविदा म्हटले आहे. त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.