मोहसीन नक्वी(फोटो-सोशल मीडिया)
Mohsin Naqvi’s stance on Asia Cup trophy: अलीकडेच २८ सप्टेंबर रोजी दुबई येथे भारताने पाकिस्तानचा अंतिम सामन्यात पराभव करून आशिया कपचे जेतेपद पटकावले. सामन्यांनंतर मैदानावर अनेक नाट्य घडून आले. आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर विजेत्या भारतीय संघाला सादर न केलेली आशिया कप ट्रॉफी एसीसीच्या दुबई मुख्यालयात ठेवण्यात आली आहे. यावर अध्यक्षांच्या मान्यतेशिवाय ती हलवू नये किंवा देऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर भारत हा विना ट्रॉफी मायदेशी परतला. नक्वी यांनी पुरस्कार सोहळ्यातून ट्रॉफी ताब्यात घेऊन निघून गेले आणि तेव्हापासून तट्रॉफी एसीसी कार्यालयातच आहे.
मोहसीन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि त्यांच्या देशाचे गृहमंत्री देखील आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. नक्वी यांच्या जवळच्या एका सूत्राकडून पीटीआयला सांगण्यात आले की, “आजपर्यंत ही ट्रॉफी दुबईतील एसीसी कार्यालयात असून नक्वी यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की त्यांच्या परवानगीशिवाय आणि वैयक्तिक उपस्थितीशिवाय ती कोणालाही हस्तांतरित करण्यात येऊ नये किंवा सोपवू नये.” तसेच ते पुढे म्हणाले, “नक्वी यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की केवळ तेच वैयक्तिकरित्या ही ट्रॉफी भारतीय संघाला किंवा बीसीसीआयला सोपवतील.”
आशिया कप २०२५ च्या संपूर्ण स्पर्धेत, भारतीय संघाने पाकिस्तानला या स्पर्धेत तीन वेळा पराभूत केले. प्रत्येक सामन्यावेळी भारताने कट्टर प्रतिस्पर्ध्यांशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंनी राजकीय हावभावांनी एकमेकांची थट्टा उडवण्यात आली. तसेच पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर अनेक राजकीय विधाने देखील केली ज्यामुळे वादाला अधिकच तोंड फुटले.
बीसीसीआयकडून ट्रॉफी घेण्याच्या मोहसीन नक्वी यांच्या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला असून पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. नक्वी यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना आयसीसी संचालक पदावरून काढून टाकले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Ind vs WI : जसप्रीत बुमराहचा जलवा कायम! भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये केला ‘हा’ कारनामा
पुढे “पीसीबी किंवा नक्वी यांच्यासाठी दीर्घकालीन परिणाम नेमके काय होऊ शकतात, हे पाहणे बाकी आहे, कारण बीसीसीआयला हे स्पष्ट आहे की नक्वी यांना भारतीय संघाला ट्रॉफी देण्याचा आग्रह करण्याचा आणि बीसीसीआयला पाठवण्यास नकार देण्याचा काही एक अधिकार नव्हता, जे या कार्यक्रमाचे अधिकृत यजमान होते,” असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.