Babar Azam, Mohmmad Rizwan (Photo Credit- X)
PCB Central Contract: पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) सध्या मोठ्या बदलाचे वारे वाहत आहेत. नुकतीच आशिया कप २०२५ साठी (Asia Cup 2025) १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये संघाचे दोन सर्वात अनुभवी खेळाडू बाबर आझम (BAbar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांना स्थान मिळाले नाही. हा धक्का ताजा असतानाच, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) जाहीर केलेल्या नवीन केंद्रीय करारामध्येही या दोन्ही खेळाडूंना मोठा फटका बसला आहे. या निर्णयांमुळे त्यांच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावर्षीच्या केंद्रीय करारातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे पीसीबीने कोणत्याही खेळाडूला ग्रेड ‘ए’ मध्ये स्थान दिले नाही. पूर्वी बाबर आणि रिझवान यांना ‘ग्रेड ए’ मध्ये ठेवले जात होते, पण आता त्यांची पदावनती झाली असून त्यांना ‘ग्रेड बी’ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या ग्रेडमध्ये त्यांच्यासोबत अबरार अहमद, फखर जमान, हरिस रौफ, हसन अली, सॅम अयुब, सलमान अली आघा, शादाब खान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांचाही समावेश आहे.
🚨 PCB CENTRAL CONTRACT 2025-26. 🚨
– NO PLAYER REMAINS IN CATEGORY A. 🤯 pic.twitter.com/6ZU4E2hEWg
— Sheri. (@CallMeSheri1_) August 19, 2025
एकीकडे वरिष्ठ खेळाडूंची पदावनती होत असताना, दुसरीकडे १२ नवीन खेळाडूंना केंद्रीय करारामध्ये स्थान मिळाले आहे. तसेच, ५ खेळाडूंना बढतीही मिळाली आहे. यामध्ये टी-२० संघाचा कर्णधार सलमान अली आगा, शादाब खान, हरिस रौफ, अबरार अहमद आणि सॅम अयुब यांचा समावेश आहे. हे खेळाडू पूर्वी ‘ग्रेड सी’ मध्ये होते, पण त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना ‘ग्रेड बी’ मध्ये आणले गेले आहे.
केंद्रीय करारातील खेळाडूंची यादी:
ग्रेड सी: फहीम अश्रफ, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद नवाज, हसन नवाज, साजिद खान, मोहम्मद हरिस, नसीम शाह, नोमान अली, सौद शकील, साहिबजादा फरहान.
ग्रेड डी: खुशदिल शाह, अहमद दानियाल, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, शान मसूद, हुसेन तलत, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास, सुफियान मुकीम, मोहम्मद वसीम ज्युनियर, सलमान मिर्झा.
पीसीबीचा हा निर्णय अनेक प्रश्न निर्माण करतो. अनुभवी खेळाडूंना बाजूला सारून युवा खेळाडूंना संधी देण्याचे हे धोरण संघासाठी योग्य आहे की नाही, हे येणाऱ्या काळातच कळेल.
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी आणि सुफियान.