क्रिकेट विश्वामध्ये आतापर्यत कमालीचे कर्णधार राहिले आहेत ज्यांनी त्याच्या संघासाठी फक्त कॅप्टन्सीच नाही तर त्याप्रकारची कामगिरी केली आहे. भारताचा युवा कर्णधार शुभमन गिल आताच कर्णधार झाला आहे पण त्याने खेळलेल्या मालिकांमध्ये कमालीची कामगिरी केली आहे, पण तो सर्वाकृष्ट कर्णधारांच्या यादीत पोहोचलेला नाही परंतु कर्णधार म्हणून या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-५ फलंदाजांच्या यादीत स्थान मिळविण्यासाठी त्याला कठोर परिश्रम करावे लागतील.
कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर ग्रॅमी स्मिथच्या नावावर आहे. त्याने १०९ सामन्यांमध्ये ४७.८४ च्या सरासरीने ८६५९ धावा केल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डर दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांनी ९३ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले आहे, ५०.९५ च्या सरासरीने ६६२३ धावा केल्या आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये रिकी पॉन्टिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने ७७ सामन्यांमध्ये ५१.५१ च्या सरासरीने ६५४२ धावा केल्या आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
या यादीत माजी भारतीय कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने टीम इंडियाचे नेतृत्व करताना ६८ सामन्यांमध्ये ५,८६४ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी उल्लेखनीय आहे. कोहलीने ५४.८० च्या सरासरीने हे धावा केल्या आहेत, जे पहिल्या पाच फलंदाजांपेक्षा जास्त आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या आणि शेवटच्या स्थानावर आहे. त्याने इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना ६४ सामन्यांमध्ये ४६.४५ च्या सरासरीने ५२९५ धावा केल्या आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया