भारत आणि इंग्लंड यांच्यातपाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आजपासून (३१ जुलै २०२५) केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जात आहे. इंग्लंड संघाने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारत या मालिकेत पिछाडीवर आहे. भारत हा सामना जिंकून मालिकेत बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इंग्लंड ही मालिका ३-१ अशी जिंकण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय फलंदाजांकडून आतापर्यंत शानदार कामगिरी करण्यात आली आहे. भारत आता पुन्हा एकदा ओव्हलवर देखील धावांचा पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. ओव्हल मैदानावर याआधी भारताच्या फलंदाजांजी खोऱ्याने धावा काढल्या आहेत. त्या भारतीय फलंदाजांची माहिती घेऊया.(फोटो-सोशल मीडिया)
PHOTOS: These 5 Indian batsmen, including KL Rahul, have made the Oval ground famous; Score runs with ease
राहुल द्रविड : ओव्हलवर सर्वाधिक धावा भारतीय खेळाडू माजी कर्णधार राहुल द्रविडने काढल्या आहेत. द्रविडने २००२ ते २०११ या दरम्यान येथे एकूण तीन सामने खेळले आहेत. या काळात त्याने ४४३ धावा केल्या आहेत. त्याची ११०.७५ अशी च्या सरासरी राहिली आहे. यामध्ये त्याने दोन शतके झळकावली आहेत. त्याची ओव्हल येथे २१७ ही सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.
सचिन तेंडुलकर : ओव्हल येथे धावा काढण्याच्याबाबत दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरचे नाव येते. त्याने ओव्हलमध्ये सहा डावांमध्ये २७२ धावा फटकावल्या आहेत. ओव्हलमध्ये सचिनने तीन अर्धशतके ठोकली आहेत.
रवी शास्त्री : तसेच तिसऱ्या स्थानावर माजी अष्टपैलू खेळाडू आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री येतात. त्यांनी ओव्हलमध्ये एकूण दोन कसोटी सामने खेळले असून या काळात त्यांनी २५३ धावा काढल्या आहेत. त्यांची सर्वोच्च धावसंख्या १८७ धावा राहिल्या आहेत.
केएल राहुल : सध्याचा सलामीवीर केएल राहुलचे ओव्हलवर धावा काढण्याच्या बाबत चौथ्या नंबरवर येतो. त्याने या ऐतिहासिक मैदानावर दोन सामने खेळले असून आज तिसरा सामना खेळला आहे. त्याच्या बॅटमधून तीन सामन्यात २६३ धावा काढल्या आहेत. २०१८ मध्ये त्याने १४९ धावांची महत्वपूर्ण खेळी खेळी होती.
गुंडप्पा विश्वनाथ : या यादीत पाचव्या नंबवर गुंडप्पा विश्वनाथ यांचे नाव येते. त्यांनी १९७१ ते १९८२ दरम्यान एकूण तीन कसोटी सामन्यांमध्ये ४८.२० च्या सरासरीने २४१ धावा केल्या होत्या. या दरम्यान, त्यांनी बॅटमधून तीन अर्धशतके झळकावली होती.