सौजन्य - PM Narendra Modi
Narendra Modi Best Wishes Indian Paralympic Athletes : पॅरालिम्पिक खेळांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 ऑगस्ट रोजी भारतीय खेळाडू पॅरालिम्पिक आपली चमक दाखवणार आहेत. आता, पॅरालिम्पिक 2024 च्या उद्घाटन समारंभाला सुरुवात होण्यापूर्वी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतीय दलाला शुभेच्छा पाठवल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील सर्व पॅरा ॲथलीट्सना देशाची शान म्हटले आहे. त्यांचा दृढनिश्चय आणि धैर्य देशासाठी प्रेरणादायी असल्याचे लिहले आहे.
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
140 crore Indians wish our contingent at the Paris #Paralympics 2024 the very best.
The courage and determination of every athlete are a source of inspiration for the entire nation.
Everyone is rooting for their success. #Cheer4Bharat
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2024
पंतप्रधानांच्या भारतीय खेळाडूंना खास शुभेच्छा
लोक त्यांच्या यशासाठी शुभेच्छा देत आहेत यावर पंतप्रधान मोदींनी सर्व भारतीय खेळाडूंचा अभिमान व्यक्त केला. याआधी, पंतप्रधान मोदींनी २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंची भेट घेतली होती आणि सर्व पदक विजेत्या खेळाडूंची स्थिती जाणून घेतली होती.
भारत किती खेळाडू पाठवत आहे?
गेल्या वेळी भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एकूण 54 खेळाडू पाठवले होते, ज्यांनी एकूण 9 खेळांमध्ये भाग घेतला होता. यावेळी, भारतीय संघात एकूण 84 खेळाडूंचा समावेश आहे, जे एकूण 12 खेळांमध्ये पदकांसाठी प्रयत्न करणार आहेत. गेल्या वेळी भारताने १९ पदके जिंकून पॅरालिम्पिकच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली होती आणि यावेळी तो विक्रम मोडीत निघण्याची अपेक्षा आहे.
भारताचा पॅरा भालाफेकपटू सुमित अंतिल
उद्घाटन समारंभात भारताचा पॅरा भालाफेकपटू सुमित अंतिल आणि शॉटपुट धावपटू भाग्यश्री जाधव ध्वजवाहक म्हणून दिसणार आहेत. गेल्या वेळी सुमितने पुरुषांच्या F64 प्रकारातील भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तर भाग्यश्री 2022 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये रौप्यपदक विजेती आहे.