कबड्डीपटू ए. बालाभारतीचा मृत्यू (फोटो - ट्विटर)
ऐन 20 व्या वर्षी ए. बालाभारतीचा मृत्यू
कंबबडी विश्वावर पसरली शोककळा
यू-मुंबा संघाने सोशल मिडियावर दिली माहिती.
काही दिवस आधी जयपूर पिंक पँथर संघातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कबड्डी विश्वात शोककळा पसरली होती. त्यामधून कबड्डी विश्व बाहेर येत असतानाच आता यू-मुंबा या कबड्डी संघातील एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. यू-मुंबा संघातील ए. बालाभारती या खेळाडूचे अचानक निधन झाले आहे. त्यामुळे कबड्डी विश्वावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.
We are deeply saddened by the untimely passing of Balabharathi, who represented Yuva Mumba earlier this year. Our thoughts and prayers are with his family, friends and teammates during this incredibly difficult time.#UMumba | #आमचीMumba pic.twitter.com/FMyXZkQrMT — U Mumba (@umumba) October 20, 2025
यू-मुंबा ने सोशल मिडियावर केली पोस्ट
ए. बालाभारती याच्या निधनाबाबत यू-मुंबाने एक पोस्ट शेअर केली आहे. ‘तरुण खेळाडू बालाभारतीच्या आकस्मिक निधनाने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. त्याचे कुटुंब, मित्र आणि संघासोबत आमच्या संवेदना आहेत.’
ए. बालाभारती हा यू-मुंबामधील सर्वात तरुण खेळाडू समजला जात होता. त्याचा खेळ देखील चांगला होता. भविष्यातील लोकप्रिय आणि यशस्वी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. युवा खेळाडूला गमवावे लागल्याने कबड्डी विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आशिया कप ट्रॉफी प्रकरणावर BCCI कडून PCB अध्यक्षांना इशारा
सप्टेंबर महिन्यात आशिया कप २०२५ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून आशिया कपचे जेतेपद आपल्या नावे केले. या विजयानंतर भारतीय संघाने पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर भारतीय संघ आशिया कपच्या ट्रॉफीविना मायदेशी परतला. त्यानंतर अनेक महानाट्य बघायला मिळाले. आता बीसीसीआयकडून आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन नक्वी यांना अधिकृत ईमेल लिहून आशिया कप ट्रॉफी भारताला परत करण्याची विनंती करण्यात आली.
नक्वी यांनी ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयात ठेवली आहे. सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले की बीसीसीआयने नक्वी यांना नवीन इशारा दिला आहे, ज्यामध्ये त्यांनी ट्रॉफी भारतात परत करावी अन्यथा पुढील महिन्यात आयसीसीच्या बैठकीत हा विषय मांडला जाऊ शकतो.
हेही वाचा : IND vs AUS : गिल आर्मी अॅडलेमध्ये दाखल! चाहत्यांकडून जोरदार स्वागत; दुसऱ्या सामन्यात रंगणार घामसान
३० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या एसीसीच्या बैठकीत, बीसीसीआयने नक्वी यांच्या वर्तनाचा निषेध करण्यात आला आणि सांगितले की आशिया कप एसीसीचा आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटले की आशिया कप २०२५ ट्रॉफी अधिकृतपणे सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील विजयी भारतीय संघाला सोपवण्यात यावी आणि ती त्वरित आशियाई क्रिकेट परिषदेला देण्यात यावी.