IPL 2025 ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. आज चार संघ आणि दोन सामने रंगणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज पहिला सामना रंगत आहे तर संध्याकाळी चेन्नई येथे चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. त्यामुळे आजचा रविवार रविवार हा आयपीएलच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. मात्र चेन्नईतील हवामानाबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे.
चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) या दोन्ही संघाचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आयपीएलमधील सर्वात दमदार असून .या दोन्ही संघांनी आतापर्यंत 5-5 अशी विजयाची ट्रॉफी हातात घेतली आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत 37 सामने झाले असून 20 वेळा मुंबई इंडियन्सने विजयाची ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान पटकावला तर चेन्नई सुपर किंग्जने देखील 17 सामन्यांवर विजय मिळवला आहे. गेले काही सामन्यातील मुंबई इंडियन्सची कामगिरी फार काही चांगली झाली नाही. त्यामुळे चाहत्यांचा देखील काही प्रमाणाच हिरमोड देखील झाला होता. मात्र आता पुन्हा नव्या ताकदीनीशी मुंबई इंडियन्स संघ सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. मात्र सामना सुरु होण्याआधीच दोन्ही संघांसाठी पावसाचं मोठं आव्हान दिसत आहे. चेन्नईच्या चेपॉक येथे आजचा हा सामना रंगणार असून वातावरणाबाबत जाणकारांकडून शंका व्यक्त केली जात आहे.
चेन्नईतील वातावरण पाहता आज दुपारी 1 ते 2 यावेळेत पावसाची चिन्ह दिसत होती. मात्र सध्या वातावरण काही अंशी ढगाळ असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचपार्श्वभूमीवर प्रसंगावधान राखण्यासाठी दोन्ही संघाच्या सामन्यांच्या ठरलेल्य़ा वेळेपेक्षा थोड्या उशिराने मॅच सुरु होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे CSK आणि MI या दोन्ही संघाच्या चाहत्यांना काही काळ वाट पहावी लागणार आहे.
हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 7:00 वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामना लाईव्ह पाहता येणार आहे. त्याचबरोबर लाइव्ह स्ट्रीमिंग JioHotstar ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.