फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Toss Update : सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यांमध्ये सनराइजर्स हैदराबादचा संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली मैदानामध्ये उतणार आहे तर पहिल्या तीन सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद रियान परागकडे सोपवण्यात आले आहे. आजच्या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हैदराबादच्या संघाकडे फलंदाजीचे आव्हान असणार आहे.
मागील सिझन म्हणजेच आयपीएल २०२४ च्या १७ व्या सीझनमध्ये कमालीची कामगिरी केली. या सीझनमध्ये सनराइजर्स हैदराबादने तीन वेळा २५० धावांचा आकडा पार केला. यामध्ये हैदराबादच्या संघाने स्वतःचा रेकॉर्ड मोडून २७० धावसंख्या उभारून इतिहास नावावर केला आहे. दोन्ही संघाच्या प्लेइंग ११ बद्दल बोलायचं झालं तर हैदराबादच्या संघाकडून सलामीवीर फलंदाज म्हणून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड येणार आहे तर तिसऱ्या क्रमांकावर ईशान किशन येईल. नितीश कुमार रेड्डी चौथ्या स्थानावर आहे तर हेनरिक क्लासेन पाचव्या स्थानावर आहे.
🚨 𝐓𝐨𝐬𝐬 🚨
Rajasthan Royals have won the toss and elected to bowl first against Sunrisers Hyderabad at the Rajiv Gandhi International Stadium.#TATAIPL | #SRHvRR | @SunRisers | @rajasthanroyals pic.twitter.com/No3UrY6FA4
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
अष्टपैलूंबद्दल बोलायचं झालं तर अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स हे खेळाडू आहेत तर गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी आणि सिमरजित सिंह हे आहेत. राजस्थान रॉयल्सच्या प्लेइंग ११ बद्दल बोलायचं झालं तर धक्कादायक म्हणजेच संजू सॅमसन संघामध्ये नाही. त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघामध्ये घेतले आहे. सलामीसाठी यशस्वी जैस्वाल आणि नितीश राणा येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर रियान पराग येऊ शकतो. मधल्या फळीत शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे आणि ध्रुव जुरेल हे असणार आहेत.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजानं बद्दल बोलायचं झालं तर जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, फजलहक फारुकी, महिष तीक्ष्णा, संदीप शर्मा हे खेळाडू आहेत.
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन,अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स, हर्षल पटेल, , मोहम्मद शमी आणि सिमरजित सिंह
यशस्वी जयस्वाल, नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, फजलहक फारुकी, महिष तीक्ष्णा, संदीप शर्मा