नवी दिल्ली : आज आयपीएलच्या सोळाव्या हंगामा त २६व्या सामनात आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत वरच्या स्थानावर असताना आज हे दोन बलाढ्य संघ एकमेकांना भिडणार आहे.
गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघात लढत :
मागील सामन्यात राजस्थान रॉयल्स ऱोमहर्षक विजय नोंदवून आपण या हंगामातील सर्वश्रेष्ठ आहोत हे दाखवून दिले होते. त्याचबरोबर लखनऊनेसुद्धा या हंगामात शानदार कामगिरी करीत गुणतालिकेत द्वितीय स्थान पटकावले आहे. दोन्ही संघांकडे फलंदाज आणि गोलंदाजांची उत्तम फळी आहे. लखनऊ सुपर जायंट्स राजस्थानसमोर थोडसे कमकुवत वाटले तरी आजचा सामना नक्कीच रोमहर्षक होणार याबाबत शंका नाही.
लखनऊ सुपर जायंट्स संघ : केएल राहुल (क), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (डब्ल्यू), आयुष बडोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, मार्क वुड, रवी बिश्नोई, अमित मिश्रा, जयदेव उनाडकट , कृष्णप्पा गौथम, प्रेरक मंकड, डॅनियल सॅम्स, मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, स्वप्नील सिंग, नवीन-उल-हक, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, करण शर्मा, मयंक यादव
राजस्थान रॉयल्स संघ : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, मुरुगन अश्विन, डॉन फेरविरा , नवदीप सैनी, जो रूट, जेसन होल्डर, आकाश वसिष्ठ, केसी करिअप्पा, ओबेद मॅकॉय, केएम आसिफ, कुलदीप यादव, कुलदीप सेन, अब्दुल बासिथ, कुणाल सिंग राठौर