फोटो सौजन्य : Lucknow Super Giants/Royal Challengers Bengaluru
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स टाॅस अपडेट : आयपीएल 2025 चा हा शेवटचा सामना बंगळुरू विरुद्ध लखनऊ यांच्यात रंगणार आहे. मागील सामन्यांमध्ये रजत पाटीदार जखमी असल्यामुळे येतो संघाचे नेतृत्व करू शकला नाही त्याच्या जागेवर जितेश शर्मा याने कॅप्टन्सी केली होती. लखनऊचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे पण ते आज टॉप दोन मधील संघाचे स्थान धोक्यात टाकू शकतात. आजच्या सामन्यात जितेश शर्मा याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना झाल्यानंतर 28 मे रोजी क्वालिफायर एकच सामना खेळवला जाणार आहे.
मागील सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आजच्या संघाचे स्टार फलंदाज विराट कोहलीवर त्यांची नजर असणार आहे तर या संपूर्ण सीझनमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण मागिल सामन्यात तो संघासाठी मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. मागील सामन्यांमध्ये लखनऊच्या संघाने गुजरातच्या संघाला पराभूत करून त्यांचे पॉईंट टेबल मधील पहिले स्थान हिसकावले होते आजही लखनऊचा असाच काहीतरी प्रयत्न असेल. त्याचबरोबर आरसीबीच्या संघातील बलवान फलंदाज टीम डेविड मागील सामन्यात तो जखमी झाला होता त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळणार नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघामध्ये आजही रजत पाटीदार हा फक्त फलंदाजीसाठीच येणार आहे, तर संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही. त्याच्या जागेवर जितेश शर्मा हा संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर टीम डेविडच्या जागेवर आज लियाम लिविंगस्टन याला संघामध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. आजच्या सामनामध्ये दिग्वेश राठी याचे लखनऊसाठी पुनरागमन झाले आहे. मागील सामन बॅन असल्यामुळे तो सामना खेळू शकला नव्हता.
🚨 Toss 🚨 @RCBTweets won the toss and elected to field against @LucknowIPL
Updates ▶️ https://t.co/h5KnqyuYZE #TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/MRrMKlH7nm
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
मिचेल मार्श, मॅथ्यू ब्रिट्जकी, निकोलस पुरण, ऋषभ पंत (कर्णधार), हिम्मत सिंग, आयुष बडोनी, अब्दुल समद, शाहबाझ अहमद, दिग्वेश राठी, आवेश खान, विलियम ओरोका
इम्पॅक्ट प्लेअर –
आकाश सिंग, प्रिन्स यादव, रवी बिश्नोई, युवराज चौधरी, अर्शिन कुलकर्णी
जितेश शर्मा (कर्णधार), विराट कोहली, फिल्म सॉल्ट, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार, कृणाल पांड्या, लियाम लिविंगस्टॅन, रोमरियो शफर्ड, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा
इम्पॅक्ट प्लेयर –
सुयश शर्मा, रसिक द्वार, टीम साईफर्त, मनोज भांडगे, स्वप्निल सिंग