RCB कडून UP Warriors चा पराभव(फोटो-सोशल मीडिया)
RCB W vs UPW W: महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या यूपी वॉरियर्सने ५ गडी गामावत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर १४४ धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या आरसीबीने हे लक्ष्य ग्रेस हॅरिसच्या अर्धशतकाच्या जोरावर १ गडी गमावून १२.३ षटकातच पूर्ण केले आणि यूपी वॉरियर्सचा ९ विकेट्सने पराभव केला.
आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर युपीने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १४३ धावा करून आरसीबीसमोर १४४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. आरसीबी धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. ग्रेस हॅरिस आणि स्मृती मानधना या सालामी जोडीने यूपीच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल चढवला आणि १० षटकातच शतकी भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला. विजयाला अवघ्या ७ धावांची आवश्यकता असताना हॅरिस बाद झाली. तिने ४० चेंडूत ८५ धावा केल्या. यामध्ये तिने १० चौकार आणि ५ षटकार लगावले. तिला शिखा पांडेने बाद केले. त्यानंतर मात्र स्मृति मानधना आणि ऋचा घोषने विजयावर शिक्कामोर्तब केले. मानधना ३२ चेंडूत ४७ धावा करून नाबाद राहिली तर ऋचा घोष देखील २ धावांवर नाबाद राहिली. युपीकडून शिखा पांडेने एकमेव विकेट घेतली.
तर यूपी वॉरियर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. यूपी वॉरियर्सने पहिला गडी हरलीन देओलच्या(११ धावा) रूपात गेला. त्यानंतर मात्र आरसीबीच्या गोलंदाजांनी यूपीच्या फलंदाजांना संधीच दिली नाही. मेग लॅनिंग १४ धावा, किरण नवगिरे ५ धावा, फोबी लिचफिल्ड २० धावा, श्वेता सेहरावत ० धावा करून हे फलंदाज बाद झाले.संघाचे पाच फलंदाज माघारी गेल्यानंतर मात्र दीप्ती शर्मा आणि डिआंड्रा डॉटिन यांनी ९३ धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि संघाचा डाव सावरला. परंतु, त्यांना धावगती मात्र वाढवता आली नाही. दीप्ती शर्मा ३५ चेंडूत नाबाद ४५ तर डिआंड्रा डॉटिनने ३७ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. आरसीबीकडून नादिन डी क्लार्क आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर लॉरेन बेलने एक विकेट घेतली.
यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): किरण नवगिरे, मेग लॅनिंग (क), फोबी लिचफिल्ड, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, श्वेता सेहरावत (डब्ल्यू), डिआंड्रा डॉटिन, सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना, शिखा पांडे, क्रांती गौड
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), दयालन हेमलता, गौतमी नाईक, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नादिन डी क्लार्क, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल
बातमी अपडेट होत आहे






