फोटो सौजन्य : BCCI
भारत विरुद्ध इंग्लंड हेड टू हेड रेकाॅर्ड : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये मालिका सुरू व्हायला फक्त तीन दिवस शिल्लक राहिले आहे. भारताचा संघ हा नव्या युवा खेळाडूंसह इंग्लंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचे कर्णधारपद हे शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. क्रिकेट विश्वामध्ये इंग्लंड क्रिकेट संघ हा एक मजबूत संघ आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. भारतीय संघाने मागील काही वर्षांमध्ये कमालीची कामगिरी केली आहे, धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये भारताच्या संघाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या होत्या त्याचबरोबर 2024 आणि 2025 मध्ये भारताच्या संघात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या.
भारतीय संघासाठी युवा खेळाडूंसह इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणे हे नक्कीच एक मोठ्या आव्हान असणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या मागील इतिहासाबद्दल सांगायचं झाले तर भारताच्या संघाने आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध एकही मालिका जिंकलेली नाही. 1990 पासूनच्या इतिहासाबद्दल बोलायचं झाले तर भारताच्या संघाला दोन मालिका ड्रॉ करता आल्या आहे तर एक मालिकेमध्ये विजय मिळवताना आहे. 1990 मध्ये झालेल्या मालिकेमध्ये भारताच्या संघाला एक शून्याचा प्रभावाचा सामना करावा लागला होता.
अहमदाबादच्या प्लेन क्रॅशमध्ये 23 वर्षीय खेळाडूंनी गमावला जीव! या क्लबसाठी खेळत होता क्रिकेट
1996 मध्ये देखील निकाल एक शून्य असा होता. 2002 मध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्ध मालिकेमध्ये १–१ अशी बरोबरी झाली. 2007 मध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्ध मालिकेमध्ये शून्य एक असेल भारताच्या संघाने ही मालिका जिंकली होती. 2011 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये मालिका पार पडली होती यामध्ये भारताचा संघाला ४–० असा पराभवाचा सामना करावा लागला होता.
२०१४ मध्ये ३–१ असा भारतीय संघाला इंग्लंडने पराभूत केले होते. २१८ मधे भारताच्या संघाला ४–१ इंग्लंड विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. तर २०२१–२२ मध्ये झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेमध्ये दोन्ही संघांमध्ये २–२ अशी बरोबरी झाली होती. भारताचा संघ आता युवा खेळाडूसह कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरले. भारतीय संघासाठी त्याचबरोबर शुभमन गिलसाठी ही मालिका फारच महत्वाची असणार आहे. रोहित शर्मा त्याचबरोबर विराट कोहली यांसारखे दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधुन निवृतीची घोषणा केली.
भारतीय संघामध्ये करुण नायर हा ७ वर्षानंतर भारतीय संघामध्ये खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर केएल राहुल, रविद्र जडेजा यांसारख्या अनुभवी खेळाडूंची देखील भारतीय संघामध्ये सामील करण्यात आले आहे.