फोटो सौजन्य - X
12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात एक वगळता सर्व २४१ प्रवाशांनी त्याचा जीव गमावला होता. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. यामध्ये प्रवाशांचा जीव हा जळुन गेल्यामुळे त्याचा चेहरा ओळखण्यात बराच उशीर झाला. आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे, यामध्ये आता या विमान अपघातात एका २३ वर्षीय क्रिकेटपटूचाही मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याचे नाव दिर्ग पटेल असल्याचे सांगितले जात आहे, जो हडर्सफील्ड विद्यापीठातही शिक्षण घेत होता.
२ जून रोजी एअर इंडियाचे विमान एआय १७१ अहमदाबादहून लंडनला जात होते यावेळी लँडिंगच्या अवघ्या २ मिनिटांतच कोसळले आणि प्रवासी त्याचबरोबर स्टाफ सर्वानाच जीव गमवावा लागला. एअर इंडियाचे हे विमान वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या वर कोसळले, ज्यामध्ये सुमारे ३० विद्यार्थी आणि विमानातील एका प्रवाशाशिवाय सर्वांचा मृत्यू झाला. या २४१ प्रवाशांमध्ये लीड्स मॉडर्नियन्स क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळणारा दीर्घ पटेल नावाचा एक क्रिकेटपटू देखील होता.
नाद करा पण दक्षिण आफ्रिकेचा कुठं… चॅम्पियन झाल्यानंतर कर्णधाराच्या नावावर तयार केलं गाण, Video Viral
हडर्सफील्ड विद्यापीठातील एका प्राध्यापकाने सांगितले की, दिर्ग पटेल हा एक मुलगा होता जो त्याच्या शैक्षणिक क्षमतेसाठी, प्रेमळपणासाठी आणि आवडीसाठी ओळखला जात असे. त्याला नेहमीच अभ्यासाबद्दल उत्सुकता असायची. तो वर्गात येत असे आणि मला प्रश्न विचारत असे ज्यावरून त्याची खोल समज दिसून येत असे.
Dirdh Patel, 23-Year-Old Cricketer, Among Those Who Died In Air India Plane Crash. Team Pays Emotional Tribute. 🙏🙏 pic.twitter.com/svKuooNbwt
— The Great India (@thegreatindiav) June 17, 2025
२०२४ मध्ये, दिर्ग पटेलने परदेशी खेळाडू म्हणून लीड्स मॉडर्नियन्सकडून क्रिकेट खेळला होता. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून क्लबलाही खूप दुःख झाले आहे. त्याबाबत एअरडेल अँड व्हार्फेडेल सीनियर क्रिकेट लीगच्या प्रवक्त्याने सांगितले की, “मूळ गुजरातचा राहणारा दिर्ग पटेल त्याच्या नवीन नोकरीत स्थिरावल्यानंतर खेळ खेळत राहण्याचा मानस होता.”
त्याने पहिल्या एकादश संघासाठी २० सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ३१२ धावा केल्या आणि गोलंदाजीत २९ बळी घेतले. पटेल यांना त्यांच्या प्राध्यापकांकडून आणि त्यांच्या क्रिकेट क्लबकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.