फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
आरजे महावेश इंस्टाग्राम स्टोरी : भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. मागील काही महिन्यात तो धनश्री वर्मासोबत झालेल्या घटस्फोटामुळे प्रचंड चर्चेत राहिला. त्यानंतर सध्या तो प्रसिद्ध आर जे महावेशसोबत डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. आरजे महावेश आणि युजवेंद्र चहल हे दोघेही बऱ्याचदा स्पोर्ट झाले आहेत. चॅम्पियन ट्रॉफीचा सामना सुरू असताना हे दोघेही एकत्र सामना पाहण्यासाठी आले होते त्याचबरोबर आयपीएलचे सामने सुरू असताना दोघांनाही एकत्र पाहिले आहे एवढेच नव्हे तर दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो परत शेअर करत असतात.
आत्ता युजवेंद्र चहलची रूमर्ड गर्लफ्रेंड आरजे महावेश हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामुळे ती सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करून अर्ज महावेश तिने लिहिले आहे की ” डेंगू हो गया यार” या पोस्ट नंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.
महवशने तिच्या चाहत्यांना इंस्टाग्राम स्टोरीद्वारे सांगितले की तिची तब्येत ठीक नाही आणि डॉक्टरांनी तिला डेंग्यू झाल्याचे सांगितले आहे. ही बातमी समोर येताच, सोशल मीडियावरील त्याचे चाहते आणि फॉलोअर्स त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत .
RJ Mahwash सध्या तिच्या नवीन वेब सिरीज ‘ प्यार , पैसा और लाभ ‘ साठी चर्चेत आहे. या मालिकेत तिने ‘ गरिमा’ नावाची भूमिका साकारली होती, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मालिकेच्या प्रमोशन दरम्यान , युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून महवाशला पाठिंबा दिला, ज्यामुळे दोघांमधील नात्याबद्दलच्या चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाल्या. या दोघांना आयपीएल सुरु असताना पंजाब किंग्सच्या बसमध्ये एकत्र जाताना देखील स्पॉट करण्यात आले होते.
महवश आणि चहल यांच्याबद्दल बऱ्याच काळापासून अफवा पसरत आहेत की दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. आतापर्यंत दोघांनीही त्यांचे नाते सार्वजनिकरित्या स्वीकारलेले नाही. चहलच्या घटस्फोटानंतर या अफवांना अधिकच बळकटी मिळाली कारण तो महवाशसोबत अनेकदा दिसला.