ऋतुराज गायकवाड(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारतात आयपीएल 2025 चा थरार संपला असून भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. २० जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या दरम्यान भारतीय संघाचे नेतृत्वाची धुरा ही युवा शुभमन गिल यांच्याकडे देण्यात आली आहे. यापूर्वी भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात २ कसोटी सामन्यांची ४ दिवसांची मालिका खेळवण्यात आली होती. अभिमन्यू ईश्वरन सराव सामन्यात संघाची धुरा देण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वाखालील संघात ऋतुराज गायकवाडलाही भारत अ संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. परंतु, त्याला भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत संधी देण्याताली नव्हती. त्यामुळे त्याने आता मोठा निर्णय घेत परदेशी संघासोबत खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : IPL 2025 : RCB संघ विकला जाणार? आयपीएलच्या इतिहासात कधी नव्हे होणार महागडा करार, वाचा सविस्तर..
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली नाही. तथापि, तो सध्या इंग्लंडमध्येच आहे. अशा परिस्थितीत गायकवाडने काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात तो काउंटी संघ यॉर्कशायरकडून खेळताना दिसणार आहे. गायकवाड एकदिवसीय कपमध्ये देखील यॉर्कशायरकडून खेळणार आहे. त्याने यापूर्वी काउंटी क्रिकेट देखील खेळले आहे.
अधिक माहितीसाठी, भारताचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि चेतेश्वर पुजारा हे देखील याआधी यॉर्कशायर संघाकडून खेळलेले आहेत. यानंतर, ऋतुराज गायकवाड आता या संघाचा भाग बनला आहे. ऋतुराज गायकवाड काउंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने खेळणार आहे. जर त्याने येथे चांगली कामगिरी केली तर निश्चितच त्याच्यासाठी टीम इंडियामध्ये पुन्हा परतण्याचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२५ च्या सुरुवातीच्या टप्प्यात ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले होते. या दरम्यान त्याला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला आयपीएलमधून बाहेर पडावे लागले. पण, आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. गायकवाड जखमी झाल्यानंतर, वरिष्ठ खेळाडू महेंद्रसिंग धोनीने सीएसकेच्या नेतृत्वाची धुरा संभाळली होती. आयपीएल 2025 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली होती. चेन्नई सुपर किंग्ज या संघ लीग टप्प्यात देखील पोहोचू शकला नव्हता.