टीम डेव्हिड(फोटो-सोशल मीडिया)
SA vs AUS : ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची टी२० मालिका सुरु आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू टिम डेव्हिडने विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यानंतर त्याच्या नावावर एका विस्वविक्रमाची नोंद झाली आहे. टिम डेव्हिडने सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम मोडीत कढला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात टिम डेव्हिडने जी कामगिरी केली त्यांनतर केवळ त्याने सूर्यकुमार यादवचा विक्रमच मोडला नाही तर तो ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो देखील ठरला. यासोबतच त्याने या सामन्यात त्याने त्याच्या टी-२० कारकिर्दीत एका डावात सर्वाधिक चेंडूंचा सामना देखील केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १७८ धावा केल्या होत्या. यामध्ये टिम डेव्हिडने ८३ धावा केल्या. यामध्ये त्याने टिम डेव्हिडने १२ चौकार आणि ८ फक्त षटकार लगावले. यादरम्यान त्याने इतके चेंडू खेळले, जे त्याने त्याच्या टी-२० कारकिर्दीत यापूर्वी कोणत्याही डावामध्ये खेळेले नव्हते.
हेही वाचा : ICC Women’s World Cup 2025 ला फक्त 50 दिवस शिल्लक! वाचा स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक
टिम डेव्हिडने त्याच्या खेळीदरम्यान ५२ चेंडूंचा सामना करत ८३ धावा केल्या. त्याने ५० पेक्षा जास्त चेंडू खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यापूर्वी, २०२० मध्ये हाँगकाँगविरुद्धच्या टी-२० डावात त्याने सर्वाधिक ४६ चेंडूचा सामना केला होता.
टिम डेव्हिडकडून सूर्यकुमारचा विश्वविक्रम खालसा
टिम डेव्हिडने सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम मोडला आहे. हा विश्वविक्रम टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक स्ट्राईक रेटशी संबंधित आहे. १० ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यानंतर, टिम डेव्हिड आता सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेला फलंदाज बनला आहे. सूर्यकुमार यादवचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात स्ट्राईक रेट १६७.०७ इतका आहे. तर टिम डेव्हिडचा स्ट्राईक रेट १६७.३७ वर पोहचला आहे.
हेही वाचा : ‘तेव्हा तर आमचा जन्मही…’ मोहम्मद सिराज माजी दिग्गजाबाबत काय बोलून गेला? वाचा सविस्तर
दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर ऑस्ट्रेलियाने १७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिका संघ २० षटकांत ९ गडी गमावून फक्त १६१ धावाच करू शकला. परिणामी ऑस्ट्रेलियाने १७ धावांनी सामना आपल्या खिशात टाकला. अशा प्रकारे ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ८३ धावांची खेळी करणाऱ्या टिम डेव्हिडची सामनावीर म्हणून निवडण्यात आले.