फोटो सौजन्य – X
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभुत करुन फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स या दोन संघामध्ये सामना पार पडला. हा सामना फारच मनोरंजक झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सच्या संघाने ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सला १ धावेने पराभुत करुन फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. तर पहिला सेमीफायनलचा सामना हा रद्द झाला. या सामन्यामध्ये पाकिस्तान विरुद्ध इंडीया चॅम्पियन्स या दोन संघामध्ये सामना खेळवला जाणार होता पण हा सामना भारताच्या खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला आणि पाकिस्तानच्या संघाला फायनलमध्ये थेट प्रवेश मिळाला.
आता त्यांचा सामना अंतिम फेरीत पाकिस्तान चॅम्पियन्सशी होईल. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संघाने १८६ धावा केल्या. नंतर ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा संघ लक्ष्याच्या जवळ पोहोचला, परंतु तो साध्य करू शकला नाही. संघ २० षटकांत फक्त १८५ धावा करू शकला.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 2 ऑगस्ट 2025 रोजी शनिवारी या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 9 वाजता सुरू खेळायला सुरुवात होणार आहे. या सामन्याचे आयोजन इंग्लंड मधील बर्मिंघम येथील एड्बेस्टन स्टेडियम येथे करण्यात आला आहे. टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षकांसाठी हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग ही फॅन कोड ॲप वर किंवा वेबसाईटवर लाईव्ह असणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १ धावेने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाकडून मोर्ने व्हॅन विक आणि जेजे स्मट्स यांनी अर्धशतके झळकावली. या खेळाडूंमुळेच संघ सन्मानजनक धावसंख्या गाठू शकला. व्हॅन विकने ५७ धावा आणि स्मट्सने ७६ धावा केल्या. कर्णधार एबी डिव्हिलियर्स मोठी खेळी करू शकला नाही आणि ६ धावा काढून बाद झाला. जेपी ड्युमिनीने १४ धावांचे योगदान दिले. संघाने २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून १८६ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स संघाकडून पीटर सिडलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
WCL 2025 च्या अंतिम सामन्यात, दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघ 2 ऑगस्ट रोजी पाकिस्तान चॅम्पियन्सशी सामना करेल. पाकिस्तान चॅम्पियन्स इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध सेमीफायनल खेळणार होते, परंतु भारतीय खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला आणि यामुळे पाकिस्तान चॅम्पियन्सना सेमीफायनल न खेळता अंतिम फेरीत प्रवेश मिळाला.