Sanju Samson (Photo Credit- X)
IPL 2026: संजू सॅमसन (Sanju Samson) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानने आपल्या कर्णधार संजूला पुढील हंगामासाठी सोडण्याचा किंवा दुसऱ्या संघात अदलाबदल (Trade) करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय का घेण्यात आला, यामागे काही ठोस कारण आहे का?
या तणावाचे मुख्य कारण जोस बटलर (Jos Buttler) असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या मेगा लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्सने बटलरला संघातून वगळले. कर्णधार संजूला हा निर्णय अजिबात आवडला नाही. बटलरने संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली होती आणि संजूला वाटत होते की त्याला कायम ठेवले पाहिजे. परंतु, बटलरऐवजी शिमरॉन हेटमायरला प्राधान्य देण्यात आले, ज्यामुळे संजू नाराज झाला. बटलरने २०२३ मध्ये ३९२ धावा आणि २०२२ मध्ये ८६३ धावा केल्या होत्या, त्यामुळे संघाचा निर्णय संजूला पटला नाही.
या घटनेनंतर, राजस्थानने संजूला दुसऱ्या संघात देण्याचा विचार केला. त्यांनी चेन्नई सुपर किंग्जशी (CSK) संपर्क साधला आणि संजूच्या बदल्यात रवींद्र जडेजा किंवा ऋतुराज गायकवाड यांना संघात घेण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु, चेन्नईने हा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे संजू पुढील हंगामात कोणत्या संघातून खेळणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. राजस्थान सध्या इतर फ्रँचायझींसोबतही चर्चा करत असल्याचे मानले जात आहे. या सर्व घडामोडी पाहता, संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट होते. पुढील आयपीएल हंगामात संजू कोणत्या संघाच्या जर्सीमध्ये दिसणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दीप दासगुप्ता आशिया कपमधील संघाबाबत बोलताना म्हटला की “संजू सॅमसन याने चांगली कामगिरी केलीय साली तरी भारतात इंग्लंड विरुद्ध त्याला धावांसाठी फार संघर्ष करावा लागला होता. भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली कोणत्याही एका बळकट संघाविरुद्ध खेळलेली ही एकमेव मालिका होती.”
दीप दासगुप्ता पुढे म्हणाला की, “शुबमन गिल हा विराट कोहलीची भूमिका उत्तम बजावू शकतो. शुबमन या अशा स्पर्धेत शेवटपर्यंत खेळून मोठी धावसंख्या उभारण्यास सक्षम आहे. शुबमनला आयपीएलमधील कामगिरीचा फायदा होईल. तसेच यूएईमधील संथ खेळपट्टीत अशा खेळाडूची गरज आहे.”