कॉमनवेल्थ क्रिकेट स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) शेवटच्या सामन्यामध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ९ धावांनी पराभव झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या पारड्यात रौप्यपदक पडलं आहे. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये भारतासमोर १६२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. मात्र भारतीय संघ १५२ धावांवर ढेपाळला. दरम्यान, बीसीसीयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) भारतीय क्रिकेट महिलांसाठी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेल्या महिला संघाचं कौतूक केलं आहे. मात्र खेळ जिंकता आला नाही याबद्दलही टीका केली आहे.
Congratulations to the Indian women’s team for winning silver ..But they will go home disappointed as it was their game tonite ..@BCCIWomen
— Sourav Ganguly (@SGanguly99) August 7, 2022
सौरव गांगुली यांनी लिहिले आहे की, कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय क्रिकेट महिलांनी रौप्यपदक जिंकलं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. परंतु, ते निराश होऊन मायदेशात परतणार आहेत. कारण हा सामना पूर्णपणे त्यांचा होता.
[read_also content=”इस्त्राइल आणि पॅलेस्टिनी संघर्ष; क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर गाझामध्ये युद्धविराम लागू https://www.navarashtra.com/world/israel-and-the-palestinian-conflict-so-gaza-cease-fire-after-missile-attack-nrgm-313304/”]
ऑस्ट्रेलियानं भारतासमोर १६२ धावांचं आव्हान उभं केलं. भारतीय महिला क्रिकेट संघाची सुरुवात खराब झाली. भारतानं २.४ षटकात २२ धावांवर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या दोन विकेट्स गमावल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिना रॉड्रिगुएजनं भारताचा स्कोर ११८ धावांवर पोहचवला. मात्र मेगन शूटच्या गोलंदाजीवर जेमिमा बाद झाली.